

Temple Renovation and Kalash Puja at Pimpalgaon Renukai
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामदैवत असलेल्या जोगेश्वरी (योगेश्वरी माता) प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार व कलश स्थापना सोहळा अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला गावासह पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होते.
जीर्णोद्धारानंतर मंदिराला भव्य आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून वेदघोष, मंत्रोच्चार आणि पूजा-अर्चा यांना सुरुवात झाली.
पुरोहितांच्या हस्ते अभिषेक, होमहवन व कलश स्थापना विधी पार पडला. "जय जोगेश्वरी माता"च्या घोषणांनी दुमदुमले. जोगेश्वरी (यो गेश्वरी) मातेचे मंदिर हे बाराव्या शतकातील हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते.
यादवकालीन शैलीची छाप असलेले हे मंदिर पूर्वी भग्न अवस्थेत होते. स्थानिक जाणकारांच्या मते, जोगेश्वरी माता ही गावाची सर्वात जुनी आणि अती प्राचीन ग्रामदैवत असून, काही काळ हे मंदिर दुर्लक्षित राहिले होते. या मंदिरात विविध देवी-देवतांचा वास असून राम-सीता, गणपती, महादेव, विष्णू देवतांच्या मूर्ती येथे पहायला मिळतात. मंदिर परिसरात हेमाडपंथी शैलीतील प्राचीन अवशेष आढळतात