नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वैष्णवांचा मेळा

लाखो वारकऱ्यांचे आगमन; टाळ-मृदंगांच्या गजरात दिंड्यांचे स्वागत
Paithan Nath Shashthi festival
नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वैष्णवांचा मेळाfile photo
Published on
Updated on

Vaishnav gathering on the occasion of Nath Shashthi festival

पैठण, पुढारी वृत्तसेवा :

शरणा शरणा एकनाथा पायी माथा ठेवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता पायी चालत आलेल्या वारकरी भक्तांचा संत-भक्तीचा अभूतपूर्व समूह टाळ-मृदंगांच्या गजरात, खांद्यावर भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन श्रीसंत एकनाथ महाराजांच्या भेटीसाठी मोठ्या उत्साहात पैठणमध्ये दाखल झाला आहे. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त पैठणनगरीत गोदातीरावर वैष्णवांचा मेळा भरू लागला आहे.

Paithan Nath Shashthi festival
Heat Wave : मार्चमध्येच मे च्या झळा, आज, उद्या तापमान ३९ अंशांपर्यंत जाणार

नित्यनियमाने पायी दिंडीद्वारे वारी करणारे वारकऱ्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गेल्या अनेक दिवसांपासून हरिनामाचा गजर करीत पैठणकडे प्रस्थान सुरू केले होते. या वारकरी भक्तांचे आगमन पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सुरू असून, गोदावरीच्या वाळवंटात, विविध महाराजांच्या मठांमध्ये, मंदिर परिसरात तसेच पंचक्रोशीतील गावांमध्ये सर्वत्र वारकऱ्यांचा गजर ऐकू येत आहे.

वारकऱ्यांच्या आगमनामुळे पैठणनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा, या भावनेतून घराघरांतून महिला-पुरुष, बालकांसह नागरिकांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्या काढून वारकऱ्यांचे स्वागत केले.

Paithan Nath Shashthi festival
Acid attack : दुचाकीचे टायर बदलणाऱ्या मेकॅनिकवर ॲसिड हल्ला

नाथषष्ठी सोहळ्याची सुरुवात करण्यापूर्वी रविवारी (दि.८) सकाळी नाथ समाधी मंदिरामागे लक्ष्मीआई मंदिरात नाथवंशजांच्या हस्ते पूजन करण्यात आले असून, सायंकाळी मानकरी मंडळींना अक्षता देऊन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले.

पैठणमध्ये विविध संत-महाराजांच्या दिंड्यांचे आगमन होताच आमदार विलासबापू भुमरे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, नगराध्यक्ष विद्याताई भूषण कावसानकर, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, अभियंता पंकज पवार, अशोक मगरे, अश्विन गोजरे, विलास गावंडे, नीता ठोके, सचिन ससाणे, नवनाथ जगधने मळा आदींनी वारकऱ्यांचे स्वागत केले.

नाथषष्ठीनिमित्त नाथांच्या समाधी व गावातील मंदिर परिसर स्वच्छ करून भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार विलासबापू भुमरे व कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथकही तैनात करण्यात आले आहे.

पहिली निर्याण दिंडी आज

नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले व पुष्कर महाराज गोसावी यांची पहिली निर्याण दिंडी सोमवारी (दि.९) सकाळी ११ वाजता गावातील नाथ मंदिरापासून समाधी मंदिरात नेण्यात येणार आहे. यावेळी मानाचे वारकरी नारदीय कीर्तन सेवा सादर करणार आहेत.

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना ६ मार्च रोजी माहिती मिळाली होती की, कैलासनगर येथील मनपाच्या बंद पडलेल्या व्यायामशाळेजवळ दोन तरुण ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

आज शहरात संत एकनाथ महाराज पालखी सोहळा

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा येथील श्री संस्थान एकनाथ मंदिरात आज श्री संत एकनाथ षष्ठी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडा आरती आणि भजनानंतर ७ वाजता श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही पालखी मिरवणूक मंदिरातून निघून कुंभारवाडा, मच्छली खडक, सराफा, शहागंज, राजाबाजार, किराणा चावडी, पानदरिबा, सुपारी हनुमान आणि गुलमंडी मार्गे पुन्हा मंदिरात येईल. या मिरवणुकीत विविध महिला भजनी मंडळे, संत मंडळी, वारकरी, टाळकरी, बँड, चौघडा, लेझीम पथके, कळस व तुळशी वृंदावन घेणाऱ्या महिला आणि झेंडेकरी यांचा मोठा सहभाग असणार आहे. दुपारी पादुका अभिषेक व महापूजेनंतर २ ते ४ वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news