

Tembhurnikar suffers from the usual traffic jams
रावसाहेब अंभोरे
टेंभुर्णी : जाफाबाद ते जालना मार्गावर टेंभुर्णी शिवाजी चौकातील बस थांब्यावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे टेंभुर्णीकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक पोलिस लक्ष देत नसल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
जाफाबाद जालना हायवे रोडवरील टेंभुर्णी बस थांबा असलेल्या शिवाजी चौकात वाहनांची वर्दळ वाढल्याने दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी दुचाकी फोरव्हीलर गाड्या उभ्या असलेल्या वाहतुकीची कोंडी होते.
याकडे स्थानिक पोलिसांनी लक्ष देऊन या वाहन धारकांना शिस्त लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीच्या कोडीला सामोरो जावे लागत आहे. पोलिसांनी लक्ष वेधून या बस थांब्या जवळ जास्त वेळ गाड्या उभ्या असणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यात यावी. यामुळे शिस्त लागेल अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे.
महिला प्रवाशांना होतोय त्रास
वाहनांच्या रहदारीतून महिलांना आपला मार्ग काढावा लागतो. यामुळे या महिला प्रवशाना वाहतुक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी लक्ष देवून रस्त्यावर दोन्ही बाजूने उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.