

Provide regular bus service on time
टेंभुर्णी, पुढारी पुढारी वृत्तसेवा : जाफाबाद एसटी बस आगारच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे. जाफराबाद ते सिडको जालना बस सेवा वेळेवर सुटत नसल्याने संभाजीनगर, जालना येथील शासकीय व दवाखान्याच्या कामानिमित्त जाणाऱ्या प्रवशाने हाल होत आहे. यामुळे राबाद आगारप्रमुख पंडित यांनी सर्व बस सेवा सुरळीत करा करावी, अशी मागणी टेभुर्णी येथील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, जाफराबाद कडून जालना किंवा संभाजीनगर बस वेळेवर धावत नसल्याने महत्त्वाच्या कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रवाशांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लांबपल्ल्याच्या बसगाड्या देखील नियमित धावल्यास टेंभुर्णी परिसरातील नागरिकांची ये जा करण्याची सोय होईल. याकडे आगारप्रमुख पंडित यांनी वेळीच लक्ष देऊन नियमितपणे सकाळी दुपारी सायंकाळी वेळापत्रक ठरवून बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.