Illegal Liquor Seized : टेंभुर्णी पोलिसांनी पकडली ६४ हजारांची अवैध दारू

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल
Illegal Liquor Seized
Illegal Liquor Seizedpudhari photo
Published on
Updated on

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली गावाजवळ टेंभुर्णी पोलिसांनी दुचाकीवर अवैध दारू घेऊन जाणाऱ्या इसमाच्‍या ताब्यातून देशी दारुच्या ७२ बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत दुचाकीसह अवैध दारू असा ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब शिवाजी खार्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्‍हंटले आहे की, पोलिस पथकासह ते पेट्रोलिंग करत असताना जाफराबाद येथून नळविहिरा मार्गे हिवराकाबली एक इसम दुचाकीवर अवैध दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परमेश्वर कुंडलिकराव जाधव याला थांबविले असता दुचाकीच्या डिक्कीमध्ये देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या.

Illegal Liquor Seized
Pandharpur Police Raids: अवैध धंद्यांवर एकाच दिवशी पोलिसांचे ४ ठिकाणी छापे

पोलिसांनी देशी दारुच्या बाटल्या व दुचाकी असा ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे करीत आहेत.

Illegal Liquor Seized
Dharashiv Crime News : क्लबवर पोलिसांची धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news