Dharashiv Crime News : क्लबवर पोलिसांची धडक कारवाई

अकरा जुगारी ताब्यात
Dharashiv Crime News
Dharashiv Crime News : क्लबवर पोलिसांची धडक कारवाईFile Photo
Published on
Updated on

Police Launch Massive Raid on Club

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव शहरालगत तुळजापूर-बीड महामार्ग बायपास परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगार क्लबवर पोलिसांनी धडक कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह वाहने व जुगार साहित्य असा एकूण ३ लाख ९० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Dharashiv Crime News
Purna Police Raid | पूर्णेत पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा; ७ बैलांसह ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे, क्यूआरटी पथकाचे अंमलदार व चालक यांनी सहभाग घेतला. छापेमारीदरम्यान घटनास्थळावरून ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dharashiv Crime News
Latur Crime | जळकोट पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; दोन हायवा टिपरसह 50.50 लाखांचा मुद्देमाल जप्त!

आरोपींकडून जुगाराचे साहित्य, ३७ हजार ७७० रुपये रोख रक्कम, एक चारचाकी वाहन, १० दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य असा एकूण ३ लाख ९० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा देत, कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news