Jalna News : हिंद-दी-चादरच्या यशस्वितेसाठी पुढाकार घ्यावा

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश
Jalna News
Jalna News : हिंद-दी-चादरच्या यशस्वितेसाठी पुढाकार घ्यावाFile Photo
Published on
Updated on

Take the initiative for the success of Hind-Di-Chadar

जालना, पुढारी वृत्तसेवा: "हिंद-दी-चादर" अंतर्गत श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नदिड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व समाजातील भाविक, सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकत्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घेवून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

Jalna News
Jalna News : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची झाडाझडती

येथील जिल्हा नियोजन सभागृहात "हिंद-दी-चादर" कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, किशन राठोड, लखीम सिंग, विलास राठोड, महंत नेहरुजी महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

'हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, आणि सीए-सआरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून शक्य तेवढी मदत पोहचविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि समाज घटकांमार्फत करण्यात येत आहे.

Jalna News
भावाअभावी मेथी पिकावर नांगर, रेणुकाई पिंपळगावात शेतकऱ्याची हतबलता

कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना व्हावी यासाठी विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करुन, सतिंदर सरताज यांचे भक्ती गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करुन या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर जी यांचे महान कार्य आणि हौतात्म्याचा इतिहासाची माहिती विद्यार्थी-विद्यार्थीना देण्यात आली आहे.

उपस्थित राहावे

जास्तीत-जास्त भाविकांना या कार्यक्रमास उपस्थित राहाता यावे यासाठी विशेष रेल्वे आणि बसेसचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येऊन त्यांच्यात देशभक्ती निर्माण होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन जिल्हाधिकरी श्रीमती मित्तल यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news