भावाअभावी मेथी पिकावर नांगर, रेणुकाई पिंपळगावात शेतकऱ्याची हतबलता

लग काही दिवसांपासून बाजारात मेथीला अत्यल्प दर मिळत असल्याने काढणी, वाहतूक व मजुरीचा खर्चही भरून न निघाल्याने शेतकरी पूर्णतः व्यथित झाला आहे.
jalna agriculture news
भावाअभावी मेथी पिकावर नांगर, रेणुकाई पिंपळगावात शेतकऱ्याची हतबलताFile Photo
Published on
Updated on

Due to low prices, farmers ploughed under the fenugreek crop

रेणुकाई पिंपळगाव, पुढारी वृत्तसेवा : रेणुकाई पिंपळगाव शिवारात मेथी भाजीला अपेक्षित भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रातील उभ्या मेथी पिकावर नांगर फिरवून ते नष्ट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलग काही दिवसांपासून बाजारात मेथीला अत्यल्प दर मिळत असल्याने काढणी, वाहतूक व मजुरीचा खर्चही भरून न निघाल्याने शेतकरी पूर्णतः व्यथित झाला आहे.

jalna agriculture news
बसस्टँड रोडवरील लॉजिंग अँड बोर्डिंगवर छापा; ८ महिलांची सुटका

सदर शेतकऱ्याने रब्बी हंगामात दोन एकरमध्ये मेथीची लागवड केली होती. बियाणे, खत, औषधे, पाणी, मजुरी यावर मोठा खर्च झाला. मात्र बाजारात मेथीला प्रति गड्डा किंवा प्रति किलो अत्यंत कमी दर मिळाल्याने आर्थिक गणित कोलमडले. काढणी करून बाजारात नेल्यास अधिक तोटा सहन करावा लागेल, या भीतीने अखेर उभे पीक नष्ट करण्याचा कठोर निर्णय घ्यावा सांगितले.

शेतकऱ्याने या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार भाव घसरल्याने भाजीपाला उत्पादकांचे आर्थिक नुकसान वाढत असून कर्जबाजारी-पणाचा धोका निर्माण झाला आहे.

jalna agriculture news
Jalna News : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची झाडाझडती

थेट विक्री व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा अशा घटना भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मी दोन एकर मेथी लागवड केली होती, परंतु मेथीला अत्यल्प भाव मिळाला. लागवड खर्चही निघत नसल्यामुळे उभ्या मेथी पिकावर नागर फिरवला आहे. त्याला जनावर देखील खात नाही. -
मनोज देशमुख, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news