इंधन तुटवड्यामुळे उन्हाळी कामे खोळंबली

शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड, शेती मशागतीचे पेच
jalna Agricultural News
इंधन तुटवड्यामुळे उन्हाळी कामे खोळंबलीfile photo
Published on
Updated on

Summer work delayed due to fuel shortage

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात शेतशिवारात मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. यासाठी डिझेलची आवश्यकता असते. याचवेळी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळणे अवघड झाले आहे. यामुळे शेतशिवारात मशागत करायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

jalna Agricultural News
Chhatrapati Sambhajinagar news | पिशोर-नाचनवेल भागात इंधन टंचाईचे सावट: मशागतीच्या कामात अडथळा, शेतकरी हवालदिल

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. उन्हाळ्यात शेतशिवारात मशागत करण्यासाठी डिझेल न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरली असून पेट्रोल पंपासमोर डिझेल तसेच पेट्रोल खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. मात्र, या ठिकाणी मोजकेच डिझेल दिले जात आहे. शेतशिवारात मशागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता आहे. हे डिझेल मिळणे तूर्त अवघड झाले आहे. यामुळे उन्हाळ्यात मशागत करायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे निर्माण झाला आहे.

jalna Agricultural News
पारध शिवारात डिझेल अभावी ट्रॅक्टर उभेच

गुढीपाडव्यानंतर शेतशिवारात मशागत करण्यासाठी सुरुवात केली जाते. यातूनच शेतकऱ्यांनी शेतशिव- ारात मशागतीला प्रारंभ केला. याचवेळी डिझेल नसल्याची अफवा गावामध्ये पसरत आहे. जो, तो डिझेल मिळविण्यासाठी धावत आहे. मात्र, त्यांना पाहिजे तितके डिझेल मिळणे अवघड आहे. यातून गावामध्ये चांगलीच धावपळ सुरू आहे. शेतशिवाराची मशागत करण्यासाठी लागणारे डिझेल, हे डिझेल मिळविताना अडचणी येत आहे.

पुरेसे डिझेल द्या

ट्रॅक्टर चालकांना मशागतीसाठी लागणारे डिझेल मिळविण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही पुरेशे डिझेल न मिळाल्याने उन्हाळ्यातील मशागत करायची कशी आणि मशागतीला विलंब झाला तर जमीन तापणार कशी, असा प्रश्न आहे. जमिनीची मशागत नसेल तर पिकांवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे शेतकरी आता चांगलेच अडचणीत आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news