Jalna News : श्री रामेश्वर साखर कारखान्याच्या वजन काट्यांची अचानक तपासणी

ऊस वजन काटे अचूक असल्याबाबत दिले प्रमाणपत्र
sugar factory weighbridge inspection
भोकरदन ः सिपोरा बाजार येथील श्री रामेश्वर साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या तपासणी करताना मान्यवर. (छाया ः रवी देशपांडे )
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील सिपोरा बाजार येथील रावसाहेबनगर येथील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखानाच्या वजन काट्यांची नुकतीच शासनाच्या भरारी पथकासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अचानक तपासणी केली. या तपासणीत कारखान्याचे वजन काटे अचूक आणि तंतोतंत असल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

सिपोरा बाजार येथील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाण्यात तहसील कार्यालयाच्या वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी कारखान्यास अचानक भेट देउन कारखान्याच्या वजन काट्याची शासनाच्या भरारी पथक व शेतकरी संघटनेकडून तपासणी करण्यात आली.

sugar factory weighbridge inspection
Rajur Chaufali cement road project : राजूर चौफुलीच्या दोन्ही बाजूने सिमेंट रस्ता होणार : भास्करराव दानवे

यावेळी वैद्यमापन शास्त्र निरीक्षक एस. एन. वाघ, तलाठी अंकुश प्रकाश बावस्कर, विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 अशोक गहेनाजी जाधव,शेतकरी संघटनेचे तालुक्याध्यक्ष काकासाहेब गणपतराव साबळे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी मुकादम आणि वाहन चालक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. वजन काट्यावर करण्यात आलेल्या चाचणीत काटा 100 टक्के अचूक असल्याचे स्पष्ट झाले.

sugar factory weighbridge inspection
Encroachment demolition drive : ड्रग्ज तस्करांच्या अतिक्रमित घरांवर चालणार बुलडोझर...

पारदर्शक कारभाराबाबत समाधान

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर करण्यात आलेल्या चाचणीत काटा 100 टक्के अचूक असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी आणि वाहनमालकांनी कारखान्याच्या पारदर्शक कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news