Jalna News : ट्रॅक्टर, रोटाव्हेटरवर मिळणार सव्वालाखांपर्यंत अनुदान; संगणकीय लॉटरीद्वारे होणार निवड

जालना जिल्हा परिषदेकडून कृषी अवजारे अनुदान योजना; ११ सप्टेंबरपर्यंत मुदत
jalna news
Jalna News : ट्रॅक्टर, रोटाव्हेटरवर मिळणार सव्वालाखांपर्यंत अनुदान; संगणकीय लॉटरीद्वारे होणार निवडFile Photo
Published on
Updated on

Subsidy of up to ₹1.25 lakh available for tractors and rotavators; selection to be made via computerized lottery

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता 'जिल्हा परिषद उपकर योजना' अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध आधुनिक कृषी अवजारांवर भरीव अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतीचे यांत्रिकीकरण वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात असून, पात्र लाभार्थ्यांनी येत्या ११ सप्टेंबर पर्यंत संबंधित पंचायत समिती स्तरावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

jalna news
Jalna road condition : पिंपळगाव रेणुकाई- धावडा रस्त्याची दुरवस्था

योजनेंतर्गत मान्यताप्राप्त चार प्रमुख कृषी यंत्रे व अवजारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २० पीटीओ एचपी व त्यापुढील ट्रॅक्टर खरेदीवर मूळ किंमतीच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटरसाठी ४० टक्के किंवा कमाल ३६ हजार ८०० रुपये, मानवचलित टोकण यंत्रासाठी (डिब्लर) ५० टक्के किंवा कमाल ८ हजार रुपये आणि ५ फूट क्षमतेच्या स्ट्रॉ चॉपर, शेडर किंवा मल्चर या यंत्रासाठी ४० टक्के किंवा कमाल ५८ हजार रुपयांचे अनुदान मर्यादित करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची जमीन असणारा ७/१२ व ८-अ उतारा, आधार कार्डची सत्यप्रत, बँक पासबुकची प्रत आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी स्वतःच्या नावावर असलेले ट्रॅक्टर आरसी बुक जोडणे बंधनकारक आहे. अर्जाची स्वीकृती १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत पंचायत समिती स्तरावर केली जात आहे. प्राप्त सर्व अर्जामधून तालुकास्तरावर संगणकीय लॉटरी पद्धतीने अत्यंत पारदर्शकपणे लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभघ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनावरीया, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे यांनी केले आहे.

jalna news
Jalna News : महापालिकेच्या ९९३ पदांच्या आकृतिबंधास शासनाची मंजुरी
जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेळेत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी संगणकीय पध्दतीने लॉटरी काढण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १४ ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. लाभार्थीनी ११ सप्टेंबरपर्यंत संबंधित पंचायत समितीस्तरावर अर्ज करावेत.
पी. बी. बनसावडे, कृषी विकास अधिकारी, जि. प. जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news