Steel prices : युध्दामुळे स्टील महागण्याची शक्यता

जालन्यातील स्टील उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण; वाहतूक व इंधन खर्च वाढल्यास बांधकाम क्षेत्रालाही बसणार फटका
jalna news
युध्दामुळे स्टील महागण्याची शक्यताfile photo
Published on
Updated on

Steel prices likely to rise due to war

जालना, पुढारी वृत्तसेवा आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा परिणाम आता जालन्यातील स्टील उद्योगावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्च्या मालाच्या आयातीवर तसेच इंधन आणि वाहतूक खर्चावर परिणाम झाल्यास जालन्यात तयार होणाऱ्या स्टीलच्या किमती वाढू शकतात, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. परिणामी याचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रा-वरही होण्याची शक्यता आहे.

jalna news
UPSC Exam : भिकन रोजेकरची यूपीएससीत 912 वी रँक

स्टीलसाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशासह इतर देशातून आयात केला जातो. प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्वाच्या समुद्री मागनि भारतात पोहोचतो. मात्र सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे या मार्गावरील समुद्री वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती जालना स्टील उद्योग क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.

याशिवाय स्टील उद्योगासाठी लागणारा कोळसाही मोठ्या प्रमाणावर आयात केला जातो. या आयातीवरही तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो.दरम्यान भारतातील जवळपास निम्मे कच्चे तेल स्ट्रेट ऑफ होर्मुज मार्गे आयात केले जाते. या मार्गावरील तणाव वाढल्यास कुड ऑइलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

jalna news
Solar agriculture pumps Jalna : 37 हजार शेतकऱ्यांनी बसविले सौर कृषिपंप

क्रूड ऑइल महागल्यास त्याचा परिणाम डिझेल-पेट्रोलच्या दरांवर होऊन वाहतूक खर्चात वाढ होऊ शकते. वाहतूक खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम स्टील उत्पादन खर्चावर होईल. परिणामी बाजारात स्टील सळईच्या किमती वाढण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

स्टील महागल्यास त्याचा परिणाम केवळ उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. देशातंर्गत सुरू असलेले मोठे पायाभूत प्रकल्प, घरबांधणी करणारे सर्वसामान्य नागरिकांनाही झळ बसू शकते. त्यामुळे आखाती देशांतील वुद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जालन्यातील स्टील उद्योग, बांधकाम क्षेत्र आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुळे जालन्यातील स्टील उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी ४.५ मिलियन टन स्टील सळईचे उत्पादन

'स्टील सिटी ऑफ इंडिया' अशी ओळख असलेल्या जालना औद्योगिक वसाहतीतून दरवर्षी सुमारे ४.५ मिलियन टन स्टील सळईचे उत्पादन केले जाते. या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप आणि आयर्न या कच्च्या मालाची आवश्यकता असते. देशातील जवळपास १० टक्के स्क्रैपची आयात जालन्ऱ्यात केली जाते, तर उर्वरित कच्त्वा मालही जगातील विविध देशांतून आयात केला जातो.

आखाती देर्शातील तणाव वाढल्यास कच्च्या मालाच्या आयातीवर आणि इंधन दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टील उत्पादन खर्च वाढू शकतो. स्टील महागल्यास बांधकाम क्षेत्रावरही त्याचा थेट परिणाम होईल. परिस्थितीवर उद्योग क्षेत्र बारकाईने लक्ष ठेवून आहे."
घनश्याम गोयल, संचालक, कालिका स्टील व अध्यक्ष, स्टील उद्योग समूह, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news