UPSC Exam : भिकन रोजेकरची यूपीएससीत 912 वी रँक

Bhikan Rozekar IPS success : शेतमजुराच्या मुलाने घातली यशाला गवसणी
UPSC Exam
पारध ः भिकन रोजेकर हा आपल्या आई-वडिलासह. pudhari photo
Published on
Updated on

Bhikan Rozekar IPS success

पारध/ आन्वा ः भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन जगन रोजेकर यांने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यू.पी.एस.सी.) परीक्षेत 812 रॅक मिळवून यश संपादन केले. शेत मजुराच्या मुलाने आय.पी.एस. पदाला गवसणी घातल्याने कौतुक होत आहे.

भिकन रोजेकर यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गावाकडे अवघी दोन एकर जमीन असून आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र आपल्या मुलाने मोठे व्हावे या आशेने त्यांनी अत्यंत कष्ट करून त्याला शिक्षण दिले.

UPSC Exam
Jalna News : रस्त्याची रुंदी वाढवून तांत्रिक चौकशी करा

भिकन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळ येथील शाळेत झाले, तर पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

अनेक अडचणी, आर्थिक संकट आणि कठीण परिस्थितीचा सामना करत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यु.पी.एस.सी. परीक्षेत 812 वी रँक मिळवत आय.पी.एस. पद मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे भिकन रोजेकर हे आज गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

UPSC Exam
Sambhajinagar Crime : मदतीचा बहाणा : कारमधून अडीच लाख पळवले

प्रेरणादायी

“भिकन रोजेकर हा आमच्या शाळेचा अत्यंत जिद्दी व मेहनती विद्यार्थी होता. अत्यंत कठीण परिस्थितीतूनही त्याने मोठे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक परिश्रम घेतले. आज त्याने आय.पी.एस. पद मिळवून आपल्या आई-वडिलांचे कष्ट सार्थ केले असून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे यश प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे मत विनय विद्यालयाचे शिक्षक जी. एस. सपकाळ यांनी व्यक्त केले.

आई-वडील निरक्षर आहेत. मात्र त्यांनी आम्हा दोघां भावांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. आम्ही शिकलो नाही, पण तुम्ही शिकून मोठे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी आई अपघातात अपंग झाली आहे. या परिस्थितीत देखील वडिलांनी आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही. अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्की मिळते.

भिकन रोजेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news