Soybean Crop : ९७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड

पिंपळगाव रेणुकाई परिसरातील चित्र, सोयाबीनचे पीक बहरले
Soybean Crop
Soybean crop : ९७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवडfile photo
Published on
Updated on

Soybean crop cultivation on an area of ​​970 hectares

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात खरीप हंगामात ९७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्या सोयाबीनचे पीक जोमात आले. उत्पन्न भरघोस होऊन भाव मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

Soybean Crop
Jayakwadi : जायकवाडीच्या पाण्याने ऊसशेतीला नवसंजीवनी !

पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी चिंतेत होते. नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशा वेळी कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेतला. गावात शेतकरी मेळावे, शेतभेटी आणि मार्गदर्शन सत्रे घेऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी वेळेवर फवारणी, सापळ्यांचा वापर आणि नियमित पाहणी केली. यामुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सध्या पिकाची स्थिती समाधानकारक आहे. शेतात हिरवागार सोयाबीन डोलताना दिसत आहे. यंदा कृषी विभागाने वेळेत मदत केल्याने मोठे नुकसान टळल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Soybean Crop
Primary Health Centre : वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका फक्त नावालाच

हवामानाने साथ दिल्यास यंदा उत्पादनही चांगले मिळेल, अशी आशा आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष बाजारभाव आणि हमीभावाकडे लागले आहे

सोयाबीन पिकावर आढळणाऱ्या अळीच्या नियंत्रणांसाठी घाबरून न जाता वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करा. पीक नियमित तपासा, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावरच शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करा. कामगंध सापळे, नीम तेल आणि जैविक औषधांचा वापर वाढवा. अफवांवर विश्वास न ठेवता कृषी विभागाशी संपर्क साधा.
- नंदकुमार पायघन, सहायक कृषी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news