Primary Health Centre : वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका फक्त नावालाच

कधी चालक गैरहजर, डिझेलचा तुटवडा, तर कधी टायर खराब; आपत्कालीन रुग्णांच्या जीवाशी खेळ
Primary Health Centre
Primary Health Centre : वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका फक्त नावालाचfile photo
Published on
Updated on

Walsavangi Primary Health Centre's ambulance exists only in name

पारध, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णवाहिका सध्या केवळ नावापुरतीच असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कधी रुग्णवाहिकेचा चालक हजर नसतो. कधी वाहनात डिझेल नसते, तर कधी वाहनाचे टायर खराब असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Primary Health Centre
Jalna News : २० ऑगस्टपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करा

वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आठ गावांसह अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात PATIENT TRANSPORT AMBULANCE-पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, प्रत्यक्षात हीच रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी वालसांगवी-पारध रोडवरील पद्मावती म्हसोबा परिसरात मोटारसायकल व मालवाहू ट्रकची जोरदार धडक झाली होती. या अपघातात एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी महिला आपल्या पतीसमोर घडलेले दुर्दैवी दृश्य पाहत घटनास्थळीच मदतीच्या प्रतीक्षेत होती.

Primary Health Centre
Gutkha Seized : ६१ लाखांचा गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

स्थानिक नागरिकांनी तातडीने वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. 'चालक बाहेरगावी असून वाहनाची चावी त्याच्याकडे आहे,' असे कारण आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

तीन दिवसांपूर्वी पद्मावती गावाजवळ क्रेटा कार विहिरीत कोसळण्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राला फोन करून अॅम्ब्युलन्सची मागणी केली. मात्र, जवळपास अर्धा ते पाऊण तास उलटूनही अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. पद्मावती परिसरात कायमस्वरूपी अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे.

संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ही गरोदर महिला व ११२ कॉलससाठी उपलब्ध आहे. यामुळे या रुग्णावाहिकेचा ठरवून दिलेल्या कामासाठीच करण्यात येतो. सर्वच रुग्णांसाठी रुग्णवाहिका कशी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
- रघुवीर चंदेल, तालुका आरोग्य अधिकारी, भोकरदन
तीन दिवसांपूर्वी रोडलगत असलेल्या विहिरीत क्रेटा गाडी कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी अपघातग्रस्ताना मदत आम्ही केली आहे. जखमींना रुग्णालात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेला फोन केला होता. सदरची रुग्णवाहिका पाऊण तास उशिराने पोहचली होती. यामुळे तातडीने या भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. नसता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वापरण्याचा आदेश देण्यात यावा.
- कल्याण पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पद्मावती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news