Jalna Crime News : कौटुंबिक कारणातून मुलाची निर्घृण हत्या

मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान्या भावाचा मृत्यू
jalna crime news
Jalna Crime News : कौटुंबिक कारणातून मुलाची निर्घृण हत्याFile Photo
Published on
Updated on

Son brutally murdered over family reasons

जालना, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने लहान भावाला लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर भागात गुरुवारी (दि.२५) समोर आली. मारहाणीच्या घटनेच्या वेळेस मुलाची आईही उपस्थित होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

jalna crime news
Chhatrapati Sambhajinagar Crime : हळदा येथे शेतरस्त्याच्या वादातून कोयता, कुऱ्हाड, काठ्यांनी हल्ला

जालना शहरातील चंदनझिरा परिसरात असलेल्या सुंदरनगर भागात, प्रकाश भगवानराव शिंदे (वय ४०) बुधवारी रात्री घरगुती कारणावरून मोठा भाऊ दीपक भगवानराव शिंदे (वय ४५) याच्याशी याचा जोरदार भांडण झाले.

भांडण विकोपाला गेल्यानंतर दीपक याने लोखंडी रॉडने प्रकाशवर वार करत त्यााला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रकाश याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन्ही भावांची आई शांताबाई भगवानराव शिंदे (वय ६०) या तेथेच उपस्थित होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मारहाणीचा कथित व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती वेगाने पसरली. जन्मदात्या आईसमोरच एका मुलाने दुसऱ्या मुलाचा जीव घेतल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चंदनझिरा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकारामुळे सुंदरनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

jalna crime news
Nanded Crime : पैशाच्या वादातून झोपेत डोक्यात दगड घालून मुलानेच केली वडिलांची हत्या

वादाच्या कारणाचा शोध

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी दीपक शिंदे याला अटक केली असून, आईच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. नेमका वाद कशामुळे झाला, याचा तपास चंदनझिरा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news