Nanded Crime : पैशाच्या वादातून झोपेत डोक्यात दगड घालून मुलानेच केली वडिलांची हत्या

कंधार तालुक्यातील धक्कादायक घटना; पाच तासांत आरोपी जेरबंद
Nanded Crime News
पैशाच्या वादातून झोपेत डोक्यात दगड घालून मुलानेच केली वडिलांची हत्याpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना कंधार तालुक्यातील हटक्याळ येथे घडली आहे. पैशांच्या कारणावरून झालेल्या घरगुती वादातून एका 27 वर्षीय मुलाने आपल्या सख्ख्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या थरारनाट्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळवळ उडाली .

या प्रकरणातील सुरेश बाबूराव मोरे (वय 48 वर्षे, रा. हटक्याळ) असे मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलगा सुदर्शन सुरेश मोरे (वय 27 वर्षे) याला अवघ्या 5 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

Nanded Crime News
कीर्तनाला जाणाऱ्या रिक्षालचालकासह कुटुंबीयांना मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, हटक्याळ येथील रहिवासी सुरेश मोरे हे गुरुवारी (दि. 14 मे) रात्री आपल्या कुटुंबासह जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना, लहान मुलगा सुदर्शन याच्या डोक्यात रागाचे भूत संचारले. त्याने क्रूरतेचा कळस गाठत अंगणातील मोठा दगड आणून झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, सुरेश मोरे यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला.

यावेळी घरात मयताची आई चौत्राबाई मोरे, वडील बाबूराव मोरे आणि भाऊ सुजित मोरे हे देखील उपस्थित होते. या घटनेनंतर मयताची आई चौत्राबाई वाबराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 तासांत आरोपी जेरबंद!

वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी सुदर्शन याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गावातून पळ काढला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच कंधार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, पोलीस हवालदार टाकरस, गुंडरे, क्षीरसागर यांनी हटक्याळचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ आणि तांत्रिक पथकाची मदत घेतली. पोलिसांनी जंग जंग पछाडत अवघ्या 5 तासांच्या आत पळून गेलेल्या खुनी सुदर्शनच्या मुसक्या आवळल्या. या धडक कारवाईमुळे कंधार पोलिसांचे कौतुक होत आहे.

Nanded Crime News
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

पैसा ठरला विनाशाचे कारण!

मृत सुरेश मोरे हे मुलगा सुदर्शन याला घरखर्चासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी पैसे देत नव्हते. याच पैशांच्या कारणावरून बाप-लेकामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत खटके उडत होते आणि घरात वाद होत होता. हाच राग मनात धरून सुदर्शनने वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले आणि झोपेतच त्यांचा गेम केला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news