Gram Swachhata Abhiyan : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; जिल्ह्यातील गावांची विभागस्तरीय तपासणी

बदनापूर तालुक्यातील वरुडी व जालना तालुक्यातील सावरगाव हडप गावांतील सुविधांची पथकाकडून पाहणी
Gram Swachhata Abhiyan
Gram Swachhata Abhiyan : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान; जिल्ह्यातील गावांची विभागस्तरीय तपासणीfile photo
Published on
Updated on

Sant Gadge Baba Gram Swachhata Abhiyan : Divisional-level inspection of villages in the district

जालना, पुढारी वृत्तसेवा: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर २०२५-२६ मधे पुरस्कार प्राप्त केलेल्या बदनापूर तालुक्यातील वरुडी व जालना तालुक्यातील सावरगाव हडप या गावांची विभागस्तरीय तपासणी विभागीय अप्पर आयुक्त (विकास) सुषमा देसाई यांनी केली.

Gram Swachhata Abhiyan
Sambhajinagar News : निविदा मागे घेण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबाव

यावेळी बोलतांना विभागीय अप्पर आयुक्त (विकास) सुषमा देसाई यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त केलेल्या गावांनी स्वच्छतेच्या कामात सातत्य राखावे. स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देणारी गावे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत असल्याचे सांगीतले.

यावेळी अप्पर आयुक्त (विकास) सुषमा देसाई यांच्यासह समिती सदस्या संगीता डोल्हारकर व संतोष चप्पलवार यांनी गावांतील स्वच्छतेच्या विविध उपक्रमांची तपासणी केली. समितीने वैयक्तिक शौचालयांची उभारणी व वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, शाळा व अंगणवाडी परिसरातील स्वच्छता, शालेय शौचालये, विद्यार्थ्यांमधील स्वच्छतेच्या सवयी, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, पाण्याची गुणवत्ता तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी बाबींची पाहणी केली.

Gram Swachhata Abhiyan
Chhatrapati Sambhajinagar ZP : जि.प. आरोग्य विभागाचा उडाला बोजवारा !

महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत देण्यात आलेले प्रशिक्षण, करपट्टी व घरपट्टी वसुली, पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या सुविधा यांची माहिती घेऊन समितीने नागरिक व महिला बचत गटांच्या सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिबाजी बारगिरे, गटशिक्षणाधिकारी वाळके, स्वच्छता अभियानाचे संवाद तज्ज्ञ तथा जनसंपर्क अधिकारी भगवान तायड, केंद्रप्रमुख झुंबड तसेच शुभम गोरे उपस्थित होते.

तपासणी प्रसंगी वरुडी ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाबाई शिंदे, राधाकिशन शिंदे, विष्णू शिंदे ग्रामविकास अधिकारी रविराज पवार तसेच सावरगाव (हडप) ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदुबाई राऊत, विठ्ठलराव डोंगरे, ग्रामविकास अधिकारी अलका धांडे, कृष्णा शिंदे, प्रभाकर डोंगरे, अशोक खांडेभराड, शिवाजी डोंगरे, रंगनाथ शिंदे, प्रवीण शिंदे, सय्यद सिकंदर, शेख ओमीद, पुरुषोत्तम जोशी, दोन्ही गावांतील मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

माहिती घेतली

अप्पर आयुक्त (विकास) सुषमा देसाई यांच्यासह समिती सदस्या संगीता डोल्हारकर यांनी पुरस्कार प्राप्त गावातील महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत देण्यात आलेले प्रशिक्षण, करपट्टी व घरपट्टी वसुली, पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या सुविधा यांची माहिती घेऊन समितीने नागरिक व महिला बचत गटांच्या सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news