Sambhajinagar News : निविदा मागे घेण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबाव

जलसंपदाच्या अधीक्षक अभियंत्याविरुद्ध अनेक तक्रारी : कारवाई शून्य
Sambhajinagar News
Sambhajinagar News : निविदा मागे घेण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबावfile photo
Published on
Updated on

Direct Pressure Exerted in the Name of Elected Representatives to Withdraw Tenders

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जलसंपदातील बहुतांश निविदा कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे हे बहुदा अधिच ठरलेले असते. एकाद्या मर्जीबाहेरील कंत्राटदार कंपनीने जर अशा निविदांमध्ये स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांकडून थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो, तरीही त्याने ऐकले नाही तर कोणती तरी त्रुटी काढून त्या ठेकेदाराला अपात्र ठरविण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News : हजारो कोटींच्या निविदांत नियम धाब्यावर

हाती आलेल्या कागदपत्रांनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. ३ मधील टप्पा ३ व ४ चे सर्वक्षण, संकल्पन करणे, अंदाजपत्रक तयार करणे, या कामाची काही महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागामार्फत निविदा काढण्यात आली. २ कोटी ११ लाख रुपये अंदाजित रकमेची ही निविदा होती.

त्यात आठ ठेकेदार कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यातील पाच कंत्राटदारांना अपात्र ठरविण्यात आले. अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये संभाजीनगरातील यश इंजिनिअर्स ही कंपनीही होती. या कंपनीने अपात्र ठरविल्यानंतर निविदात सहभागी झालेल्या सर्व ठेकेदारांच्या कागदपत्रांचा अभ्यास केला तेव्हा आपल्याला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यश इंजिनिअर्सने निविदेत झालेल्या गैरप्रकाराबाबत सविस्तर तक्रार जलसंपदाचे मुख्य अभियंत्याकडे २९ स्पटेंबर रोजी केली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : ठराविक कंत्राटदारांनाच बहुतांश कामे

तक्रारीत गंभीर आरोप

यश इंजिनिअर्सने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या निविदात पात्र ठरविण्यात आलेल्या वर्कमेट्ससह अन्य दोन कंत्राटदारच वास्तविक पाहता अपात्र होते. आधीच या निविदेतून आम्ही माघार घ्यावी, यासाठी अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी आमच्यावर दबाव टाकला. आष्टी मतदारसंघातील एका लोकप्रतिनिधीच्या संबंधित एजन्सीला हे काम द्यायचे ठरले आहे.

त्यामुळे तुम्ही माघार घ्या, अन्यथा तुमची निविदा आम्हाला अपात्र करावी लागेल. आम्ही दबाव झुगारला. निविदा मागे घेतली नाही. त्यामुळे शिंगाडे यांनी त्रुटी काढून आम्हाला अपात्र ठरविले. इतकेच नव्हे तर पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण योजना भाग २, कालवा क्र. २ वरील सर्वेक्षण कामाच्या निविदेतही अधीक्षक अभियंता शिंगाडे यांनी आमच्यावर निविदा मागे घेण्यासाठी दबाव टाकला.

हे कामही पैठण येथील लोकप्रतिनिधींच्या संबंधित एजन्सीला द्यायचे आहे, तुम्ही माघार घ्या, असे आम्हाला बजावले. तिथेही आम्ही माघार घेतली नाही तेव्हाही आम्हाला कागदोपत्री त्रुटी काढून ७५ लाख ४८ हजारांचे अंदाजपत्रक असलेल्या या कामात अपात्र ठरविण्यात आले. विशेष म्हणजे आमची कमी दराची निविदा असतानाही आमच्यापेक्षा १३ लाख रुपये जास्त दराची निविदा स्वीकारत शासनाचे १३ लाखांचे नुकसान केले.

त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबावा

या आरोपासंदर्भात अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे यांना दै. पुढारी प्रतिनिधीने विचारणा केली असता या तक्रारदारांनी माध्यमांकडे जाण्याऐ-वजी कायदेशीर मार्ग अवलंबावा, असे उत्तर त्यांनी दिले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास वास्तविक पाहता, अन्याय झालेल्या ठेकेदारांनी कायदेशीर मार्गाचाच अवलंब केलेला दिसतो. म्हणून तर त्यांनी जलसंपदाच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत दाद मागितली; परंतु वरिष्ठ पातळी-वरही काहीच होत नसल्याने काही ठेकेदारांनी आता न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी केली आहे

अनेक तक्रारी केराच्या टोपलीत

यश इंजिनिअर्सने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निविदाच्या गैरप्रकाराची २९ सप्टेंबर २०२५ रोजी तर पैठणच्या गैरप्रकाराची २३ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारींवर काहीही कारवाई झालेली नाही, विशेष म्हणजे याच तक्रारींच्या प्रती जलसंपदाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि कार्याकारी संचालकांकडेही पाठविण्यात आल्या होत्या, तरीही काहीच झाले नाही. यश इंजिनिअर्स हे महामंडळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये अशाच पद्धतीने दबावतंत्र, पक्षपातीपणा आणि नियमबाह्यरीत्या मर्जीबाहेरच्या अनेक ठेकेदारांना अपात्र करून कामांपासून वंचित ठेवले आहे. आपल्यावरील अन्यायाबाबत ठेकेदारांनी अशाच हरकती दाखल केल्या; परंतु त्यांना वरिष्ठांकडूनही दाद मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news