Jalna News : सदर बाजार पोलिसांनी गावठी कट्टयासह तरुणांना केले जेरबंद

२० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त
Jalna News
सदर बाजार पोलिसांनी गावठी कट्टयासह तरुणांना केले जेरबंदfile photo
Published on: 
Updated on: 

Sadar Bazar police apprehend youths in possession of a country-made firearm (katta)

जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अवैध अग्निशस्त्रांविरोधात धडाकेबाज कारवाई करत गावठी कट्टयासह दोन तरुणांना ताब्यात घेतले. या कारवाईत २० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे.

Jalna News
Jalna News : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून अखेर रब्बीसाठी पाणी !

सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी डीबी पथकाला फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना १३ नोव्हेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत जयेश किशोरसिंग राजपूत व त्याचा मित्र नंदू अभय पारवे यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे डीबी पथकाने नंदू अभय पारवे (वय १९, रा. कोष्टी गल्ली, जालना) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने जयेश राजपूतकडून काही दिवसांपूर्वी वापरण्यासाठी गावठी कट्टा घेतल्याची कबुली दिली. तसेच हा कट्टा पुन्हा जयेश राजपूत याच्याकडे परत दिल्याचे सांगितले.

Jalna News
Jalna News : बाबासाहेब सवडेंनी स्वखर्चातून उभारला पाणवठा

त्यानंतर पोलिसांनी जयेश किशोरसिंग राजपूत (वय २१, रा. बालाजी गल्ली, गांधीनगर, जालना) याला बालाजीनगर परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गावठी कट्टा गौरी जिनिंग, गांधीनगरच्या पाठीमागील बाजूस लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन झाडाझडती घेतली असता जयेश राजपूत याने लपवून ठेवलेला २० हजार रुपये किमतीचा स्टील बॉडी असलेला गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) काढून दिला पोलिसांनी तो जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक. तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप व सदर बाजार डीबी पथकातील अधिकारी आणि अंमलदास यांनी केली.

या प्रकरणातील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध शस्त्रांविरोधात सदर बाजार पोलिसांनी केलेल्या या कारवा-ईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.