Jalna News : बाबासाहेब सवडेंनी स्वखर्चातून उभारला पाणवठा

टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करून मुक्या जीवांची भागविताहेत तहान
Jalna News
Jalna News : बाबासाहेब सवडेंनी स्वखर्चातून उभारला पाणवठाfile photo
Published on: 
Updated on: 

Babasaheb Sawde built a watering spot at his own expense

डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा, किन्ही व कचनेरा या गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सूर्यकलाबाई सवडे यांचे पुत्र बाबासाहेब सवडे यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी स्वखर्चातून पाणवठा तयार केला असून, टँकरद्वारे त्यात नियमित पाणी टाकण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

Jalna News
Fraud Case : मदतीच्या बहाण्याचे वृद्धाचे ७४ हजार रुपये लाटले

तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे उन्हाच्या तीव्रतेसोबतच जलसाठ्यांनी तळ गाठल्याने नदी, नाले, तलाव आणि नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागले आहेत परिणामी, जंगल परिसरातील वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.

पाण्याअभावी वन्यजीवांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असताना बाबासाहेब सवडे यांनी पुढाकार घेत वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

स्वतःच्या खिशातून खर्च करून पाणवठा तयार करणे आणि त्यात टँकरने नियमित पाणी उपलब्ध करून देणे, ही बाब केवळ सामाजिक उपक्रम नसून निसर्गाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी आहे.

Jalna News
Sambhajinagar News : पाणीप्रश्नावरून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती
दुष्काळामुळे केवळ माणसांनाच नव्हे, तर जंगलातील मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मी स्वखर्चातून पाणवठा तयार केला आहे वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी टँकरद्वारे नियमित पाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येकांनी आपल्या भागात प्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करावी.
बाबासाहेब सवडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.