Ichsheshwar Mahadev temple : पावसासाठी इच्छेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
Ichsheshwar Mahadev temple
Ichsheshwar Mahadev temple : पावसासाठी इच्छेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेकfile photo
Published on
Updated on

Rudrabhishekam at Ichsheshwar Mahadev temple for rain

जालना, पुढारी वृत्तसेवा : विप्र फाउंडेशन शाखा जालना यांच्यावतीने गायत्री नगर येथील इच्छेश्वर महादेव मंदिरात पावसाठी रुद्राभिषेक करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Ichsheshwar Mahadev temple
Ghansavangi drought : दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजरा

पिकांना पाण्याची गरज असतानाच पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान भोलेनाथाच्या चरणी मुबलक पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावा आणि मुक्या जीवांचे जीवनमान आनंदी व्हावे, या मंगल भावनेतून अध्यक्ष रामनिवास गौड यांच्यावतीने रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी संघटन महामंत्री पवन जोशी, कोषाध्यक्ष ललित बिजावत, जालना अध्यक्ष जयप्रकाश श्रीमाली आदींची उपस्थिीती होती.

Ichsheshwar Mahadev temple
Kunbi records : कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्रेही मिळाली !

जिल्हाभरात सुमारे ३९ दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महादेवाकडे पाऊस पडू दे असे साकडे घालण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news