Kunbi records : कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्रेही मिळाली !

१८ हजार २९५ अर्जापैकी १८ हजार २७६ प्रमाणपत्रांचे वितरण; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Kunbi records
Kunbi records : कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्रेही मिळाली !file photo
Published on
Updated on

Kunbi records were found, and certificates were obtained too!

जालना, पुढारी वृत्तसेवा: कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेत जालना जिल्हा अग्रेसर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या १८ हजार २९५ अर्जापैकी तब्बल १८ हजार २७६ अर्ज मंजूर करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. केवळ १९ अर्ज इतर जिल्ह्यांतील पुरावे असल्याने नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज नामंजूर होण्याचे प्रमाण अवघे ०.१ टक्का असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

Kunbi records
Jalna News : १५ कोटींचे टेंडर रखडले; स्वच्छतेचा बोजवारा !

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल उपस्थित होते. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या अभिलेख तपासणीत जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या ५ हजार २७ नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झाले.

जिल्ह्यातील प्राप्त अर्जापैकी सर्व पात्र अर्जावर कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, आजमितीस जात प्रमाणपत्र वितरणासाठी एकही अर्ज प्रलंबित नसल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आढळलेल्या कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदींची माहिती २३६ ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची जालना जिल्हा प्रशासनाला काळजी असल्याचेही जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले. प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kunbi records
Ghansavangi drought : दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजरा

हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे ३७७ प्रमाणपत्रे

हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे जिल्ह्यात एकूण ४२१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३७७प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, ४४ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी यापूर्वीही जिल्ह्यात विशेष शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आणि त्यानुसार प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

३५ हजार ९८१ एसईबीसी प्रमाणपत्रांचे वितरण

जालना जिल्ह्यात मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसीच्या १० टक्के आरक्षणानुसार आतापर्यंत ३५ हजार ९८१ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे १ हजार ६७४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार १६ प्रमाणपत्रे वैध ठरविण्यात आली आहेत. ४९२ प्रकरणे प्रलंबित असून, त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे १३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news