Ghansavangi drought : दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजरा

सर्जा-राजाला बकेटभर पाण्यात आंघोळ; आनंदावर चिंतेचे सावट
दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजरा
दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजराfile photo
Published on
Updated on

Bail Pola celebrated in Ghansavangi under the shadow of drought

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यात यंदाचा बैलपोळा सण बळीराजाने मोठ्या श्रद्धेने साजरा केला; मात्र यंदा पोळा सणावरही दुष्काळाच्या झळा जाणवल्या. पाऊस पडला नसल्याने बैलाला बकेटभर पाण्यात आंघोळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजरा
Ghansawangi : बकेटभर पाण्यात सर्जा-राजाची अंघोळ !

पोळ्याच्या दिवशी घरासमोर सर्जा-राजाची पूजा सुरू होती. अंगणात रांगोळी, शिंगांना रंग आणि गळ्यात घुंगरू होते; मात्र शेतकऱ्यांच्या नजरा वारंवार आभाळाकडे लागल्या होत्या. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून, पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे.

शेतीतून उत्पन्नाची आशा मावळत असताना जनावरांचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे यंदाचा पोळा साजरा करताना हात जोडून सर्जा-राजाची पूजा झाली; मात्र मनातून मात्र बळीराजा पावसासाठी आभाळाकडे पाहत राहिला.

दुष्काळाच्या छायेखाली घनसावंगीत बैलपोळा साजरा
Jalna News : १५ कोटींचे टेंडर रखडले; स्वच्छतेचा बोजवारा !

घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप -. पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी पशुधनासाठी चारा-पाणी आणि आर्थिकसंकट या समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत.

भोकरदन तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा

भोकरदन तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. मात्र शेतकऱ्यांनी त्यांना शेती कामात कायम साथ देणाऱ्या सर्जा राजाचा हा सण असल्याने शेतकरी राजाने आपले दुःख बाजूला ठेवून त्याच्यासाठी बाराही महिने शेतीत काम करणाऱ्या सोबत्याचा बैलपोळा सण उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात साजरा केला. काही ठिकाणी प्रथम कुणाचा बैल मनाची पोळी खाऊन पोळा फोडेल यावरून किंचित कुरबुरी झाल्या मात्र कुठे मोठा वाद न होता हा सण शांततेत व उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news