

Rotavator rotated on soybean crop, disease outbreak, demand for Panchnama
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, कोठा कोळी परिसरात शेतकऱ्यांनी खरीपात पेरणी केलेले सोयाबीन खराब होण्याचे सत्र थांबत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. पेरणीचा काळ देखील निघून गेला असल्याने या शेतात काय पेरावे असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोठा कोळी येथील शेतकरी रामु बावस्कर यांनी तीन एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकांवर रोटाव्हेटर फिरवला आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी, मका पिकासोबतच आहे. यंदा देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसनवारी करीत हजारो हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण केली. परंतु सोयाबीन पिक उगवून आल्यावर त्याला उन्नी लागत असल्याचे चित्र या भागात मागील तीन आठवड्यांपासून सतत दिसत आहे.
शेतकऱ्यांनी यावर उपाय करण्यासाठी महागडी औषधी फवारणी केली. परंतु सोयाबीन पिकाला पसंती दिली अशाप्रकारे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागत आहे. तिन एकर सोयाबीनची दुबार पेरणी यंदा सोयाबीनची तिन एकर पेरणी केली मात्र हे सोयाबीन पिकाला उन्नी रोगाने कवटाळल्याने मला पूर्ण सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवावा लागला त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याप्रमाणे परिसरात अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिक मोडावे लागले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.