Jalna Crime News : खुनाच्या तीन घटनांनी घनसावंगी तालुका हादरला

दोन दिवसांत तीन खून; घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तालुक्यात उडाली खळबळ
Jalna Crime News
Jalna Crime News : खुनाच्या तीन घटनांनी घनसावंगी तालुका हादरला File Photo
Published on
Updated on

In Ghansawangi taluka, three murders occurred in two days.

जालना, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यातील गंगुजळगाव, सुतगिरणी फाटा व बोधलापुरी येथे गेल्या दोन दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्याने तालुका हादरला आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस तपास सुरु आहे. शनिवारी व रविवारी झालेल्या या घटनामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

Jalna Crime News
Bike Thieves Arrested | महागड्या मोटारसायकल चोरी करणा-या आरोपीतांना परतूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बोधलापुरीत जुन्या वादातून तरुणाचा खून, पाच जणांनी केला तरुणावर अमानुष हल्ला

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः जुन्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एक तरुणावर अमानुष हल्ला करत त्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथे रविवार (३) रोजी घडली. मृत तरुणाचे नाव संभाजी भानुदास उंडे (वय २७ वर्षे) असे आहे.

संभाजी ठंडे हे त्यांच्या बडिलांसह दुचाकीवरुन अबडकडे जात असताना गावातील अर्जुन वाघमारे यांच्या घराजवळ माजी सरपंच गटातील पाच जणांनी त्यांना अडवले, यावेळी लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.

Jalna Crime News
Manoj Jarange Patil | रुग्णालयाची लिफ्ट कोसळली : मनोज जरांगे पाटील यांना दरवाजा तोडून बाहेर काढले !

उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संशयित आरोपी आत्माराम सुभाष मोरे, सचिन आत्माराम मोरे, सुशिल आत्माराम मोरे, विशाल दत्ता मोरे, अक्षय मानिक मोरे (सर्व रा. बॉधलापुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत फिर्यादीची पत्नी अंतिका उडे यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे घनसावंगी पोलिसांनी सांगितले.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा निघृण खून, पतीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव येथे शनिवारी मध्यरात्री पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलन DO NOT CROS NO कांता गुढेकर (वय ३१) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

संशयित आरोपी कांता दगडू गुवेकर CRIME SCE यांस घनसावंगी पोलिसांनी अटक करून रविवार (३) रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात बसंत बाबुराव सुतार यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, मृत फुलन गुडेकर हिचा पती कांता दगडू गुढेकर याने पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय घेऊन तिच्या छातीवर कोणत्या तरी घातक हत्याराने वार करून तीचा खून केला.

घनसावंगी पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक केतन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, उपनिरीक्षक रामदास काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

प्लॉटच्या वादातून एकाचा खून, घनसावंगी तालुक्यातील फाट्यावरील घटना

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः

घनसावंगी तालुक्यातील सुतगिरणी फाट्यावरील प्लॉटच्या वादातुन एका जणाचा अंगावर टेम्पो घालुन खुन करण्यात आल्याच्या आरोपावरुन एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत लता इश्वर सोळंके यांनी घनसांवगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, त्यांचे वडील श्रीरंग पडोळकर यांचा घनसावंगी येथील सुतगिरणी फाट्यावर अडीच गुंठ्याचा प्लाट आहे. सदर प्लॉटमधुन नुरजा इकबाल पठाण व त्यांच्या कुटुंबीयांनी रस्ता तयार करुन CRIME रस्ता तयार यांनी ४ जुलै रोजी सदरच्या प्लॉटची जागा ही भुमी अभिलेख यांच्या कडुन मोजुन रितसरपणे सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढले होते. व तेथे सदर जागा ताब्यात घेवुन सिंमेट पोल लावुन तारेंचे कंम्पाउंड़चे काम चालु होते.

तेव्हा पासुन नुरजा इकबाल पठाण व तिचे मुले हैदर इकबाल पठाण च रहिन इकबाल पठाण हे माझे वडील श्रीरंग पडोळकर, भाऊ प्रकाश पडोळकर, आई गिताबाई पडोळकर व करून सकाळी दहा वाजेच्या सुमारास लता सोळंके या त्यांच्या आई गिताबाई, वडील श्रीरंग व भाऊ प्रकाश, भाऊजयी निशा प्रकाश पडोळकर, आत्या मळाबाई साहेबराव पवार हे घनसावंगी येथील सुतगीरणी फाट्या जवळील प्लॉटवर येवुन ट्रॅक्टरने प्लॉटवर मुख्म टाकण्याचे काम करत होत्या. यावेळी दुपारी १.०० वाजेच्या सुमारास हैदर इकबाल पठाण हा चारचाकी वाहनातुन तेथे आला. मध्ये आता, व माझे वडील व भाऊ प्रकाश यांना म्हणाला की, तुम्ही येथे कशाला आलात, तुम्ही यावेळी त्याने तार कम्पाउंड करायचे नाही असे सांगीतले.

यावेळी श्रीरंग पडोळकर यांनी त्याला सदरचा प्लॉट हा आमचा आहे. आम्हाला येथे काम करु दे. तुझा माझ्या प्लॉट मधून रस्ता नाही. तु माझ्या प्लॉट मधुन जात जावु नकोस असे सांगीतले.

उपचारादरम्यान मृत्यू

हैदर याने माझ्या वडीलांना शिवीगाळ करीत आता तुला जिवे मारतो असे म्हणत चारचाकी वाहनाची जोरात धडक देउन त्यांना खाली पाडले. त्यानंतर श्रीरंग पडोळकर यांच्या अंगाचरुन वाहन नेउन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हैदर याने स्वतः जवळील चाकु काढून स्वतः च्याच दंडरावर मारुन घेत जखमी केली.

त्यानंतर श्रीरंग पडोळकर यांना छोटा हत्ती वाहनातुन घनसावंगी येथील सरकारी दवाखाण्यात नेले होते. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन जालना येथे पाठविले.

उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात आरोपी हैदर पठाण याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news