नांगरतास व शंभू महादेव मंदिरात गर्दी, मंदिर परिसर निसर्गरम्य, धबधब्यामुळे वातावरणात चैतन्य

श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
Jalna NEWS
नांगरतास व शंभू महादेव मंदिरात गर्दी, मंदिर परिसर निसर्गरम्य, धबधब्यामुळे वातावरणात चैतन्य File Photo
Published on
Updated on

Crowd at Shambhu Mahadev Temple, temple premises are scenic

सुधाकर पडोळकर / संजय खंदारे

वाटुर / पांगरी : मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र शंभु महादेव व नांगरतास येथे श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

Jalna NEWS
Jalna Crime News : खुनाच्या तीन घटनांनी घनसावंगी तालुका हादरला

प्रभु श्रीराम चंद्र वनवासात असताना ते नांगरतास व शंभु महादेव या परीसरात आले होते. यावेळी श्री प्रभु श्रीरामांनी येथे नांगर हाणला. त्यामुळे या तिर्थक्षेत्राला नांगरतास असे नांव पडल्याची अख्यायिका आहे. शंभू महादेव परिसर प्रभु रामांच्या पदस्पशनि पावण झाला आहे. येथे हेमाडपंथी मंदिरावर दगडाचे सुरेख कोरीव काम करण्यात आले आहे. महान तपस्वी श्री महंत कामगीरी महाराज यांचे या भागात वास्तव्य होते. रामगीरी महाराज यांनी श्री क्षेत्र शंभु महादेव व नांगरतास येथील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नांगरतास संस्थानला पंधरा एकर तर शंभु महादेव संस्थानला एकविस एकर जमीन आहे.

नांगरतास तिर्थक्षेत्र हे श्री रामगीरी महाराज ट्रस्ट कडे आहे. मध्यंतरी शंभु महादेव तिर्थक्षेत्र हे शासनाच्या ताब्यात असुन या तिर्थक्षेत्राचा पाहिजे तेवढा विकास नव्हता. चार महिन्यांपूर्वी शंभु महादेव संस्थानचा संपुर्ण कारभार व व्यवस्था ही श्री महंत कामगीरी महाराज ट्रस्ट शंभु महादेव संस्थान व नांगरतास संस्थान यांच्या ताब्यात आले आहे. निसर्गरम्य असलेल्या मंदीरात भाविकांची गर्दी होत आहे.

Jalna NEWS
Jalna Accident : दाेन दुचाकी-टाटा मॅजिक अपघातात एक ठार
भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शासनाने या तिर्थक्षेत्र साठी सभागृह, स्वच्छतागृह, पार्कीग व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
श्री महंत बालकगीरीजी महाराज
सध्या हे संस्थान श्री महंत रामगीरीजी महाराज ट्रस्ट शंभु महादेव, नांगरतास यांच्या ताब्यात आहे. शासनाने लक्ष देऊन भाविक भक्तांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- श्री महंत भागवतगीरीजी महाराज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news