

Robbery accused arrested from Karnataka
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना व बीड शहरात जबरी चोरी करणारा सराईत आरोपी कनार्टक राज्यातुन जेरबंद करण्यात आला आहे. जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीचे असे पाच गुन्हे उघड झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
शहरामध्ये जबरी चोरी व मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आर-ोपीतांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. ५ जुलै रोजी अरुण गणपतराव मोहिते (रा. साईनगर मंठा चौफुली) यांनी पोलीस ठाणे तालुका जालना येथे फिर्याद दिली की, ४ जुलै २०२५ रोजी आरंभहॉस्पीटल येथे दोन अनोळखी मोटार सायकलस्वारांनी फिर्यादी यांची पत्नीच्या गळयातील दोन तोळे वजनाची मिनी गंठण हिसकावुन घेऊन गेल्याची तक्ररार दिली होती.
गुन्हयातील आरोपी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत निष्पन्न करुन अशोक उर्फ मुकेश भिकाजी तरकसे (रा. कन्हैयानगर, जालना) याने त्याचे साथीदारासह केले असल्याचे निष्पन्न झाला. त्यामुळे मुकेश तरकसे याचा शोध घेतला असता तो विजापुर, राज्य कनार्टक येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास विजापुर, कनार्टक येथुन ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदारासह केला असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी तालुका पोलीस ठाणे, जालना येथे हजर केले आहे. अशा विविध गुन्हे केल्याची कबुली देवून वीस हजार रूपये किंमतीची एक स्कुटी व ३५ हजार रूपये किंमतीची एक दुचाकी मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, देविदास भोजने, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, रमेश काळे, गणपत पवार, अशोक जाधवर यांनी केली आहे.
विविध ठाण्यांतील गुन्हे उघड
जालना शहरात गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या घटनात वाढ झाली होती. आरोपीस अटक केल्याने विविध ठाण्यातील पाच गुन्हे उघड झाले आहे. यात जालना शहरातील सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहे. तसेच पोलीस ठाणे कदिम (घरफोडी), चंदनझिरा पोलीस ठाणे (जबरी चोरी), पोलीस ठाणे बीड ग्रामीण (जबरी चोरी) हे गुन्हे उघड झाले आहे.