

Maize crop damaged by rain, farmers in distress, demand for compensation
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गेल्या पाच दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पडून असलेल्या मका पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात पडेल असलेल्या मक्याचा चारा पूर्णपणे खराब झाला आहे.. त्यातच मकाच्या कणसाला कोंब फुटत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. दिवाळीच्या सणासुदीमध्ये शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.
यावर्षी पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबवणीवर पडला आहे. खरिप हंगामातील पीकेच शेतात उभी आहे. खरिप हंगामातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी मजूर न लावता मका घरीच सोंगणी केली. सोंगणी झाल्यानंतर पाऊस झाल्याने कणसे शेतात पडून आहे. त्यांना कोंब फुटत आहे.