

आन्वा ः सध्या तालुक्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. मार्च महिन्यातच सकाळपासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमानात वाढ होऊन तापमान वर पोहोचले आहे. दुपारच्या सुमारास अंगाला अक्षरशः जाणवू लागले आहेत. अशातच सध्या शेतशिवारात पिकाच्या मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. शेतमजूर उन्हाची पर्वा न करता व्यस्त झालेला दिसत आहे. मात्र, उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून, हे सर्व पोटाची भूक भागवण्यासाठी चालल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन खरीप हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन हंगामाच्या कामात घरी बसावे लागले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न शेतकऱ्यांसह उभा होता.
यावर्षी खरीपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील गहू, आणि हरभरा या आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या आयुष्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी हरभरा पीक काढण्यासाठी लगबग दिसून येत आहे. मात्र, हरभरा एकाचवेळी आल्यामुळे शेतकऱ्याची होताना दिसून येत आहे.
सध्या आपले प्रखर रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यातच सूर्य प्रचंड आग ओकत आहे. मात्र, याही स्थितीत रखरखत्या उन्हात शेतमजूर शेतात काम करताना दिसून येत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऊन तापायला सुरुवात झाली. उन्हामुळे पीक चांगले असून, ते झाले आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. आपली आर्थिक भागवण्यासाठी सध्या शेतकरी बाजारात हरभरा विक्री करत आहेत. त्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हरभरा वेग आला आहे.
मागील वर्षी खरीप हंगामातील नगदी पीक असलेला कापूस आणि सोयाबीन हे पीक पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यातून राहिलेल्या सोयाबीन पिकांवर या रोगाचा तर कपाशीवर लाल्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी पिकांची लागवड केली.
उदरनिर्वाह शेतीवर
ग्रामीण भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह हा केवळ शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी सुखी तर सुखी अशी स्थिती ग्रामीण भागातील आहे. सध्या हरभरा काढणी आदी कामांना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. सध्या शेतमजूर भर उन्हात ही कामे करताना दिसून येत आहेत. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी दोन पैसे मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.