आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला

वडीगोद्री येथे उपोषण करणारे  लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
वडीगोद्री येथे उपोषण करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: राज्यात आतापर्यंत आमच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला पाहिजे होती. आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत, आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते असून शासनाला आमची दखल घ्याविशी वाटत नाही. पण माय बाप सरकार, ओबीसींची भाषा समजून घ्या, आमची दखल घेऊ नका, पण व्हीजेएनटी,  ओबीसींची बाजू काय आहे, हे तरी समजून घ्या, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी

आज (दि.१९) केली. हाके यांचा ओबीसी बचाव आरक्षण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

ओबीसींचे आरक्षण मिळाले म्हणजे सगळे प्रश्न सुटत नाही. आरक्षण म्हणजे रेशन वाटपाचा कार्यक्रम नसून मनोज जरांगे बाजू मांडत आहेत, ती बरोबर आहे. पण त्याला ओबीसी आरक्षण हाच पर्याय नाही. जरांगे यांचा सल्लागार आहे तरी कोण?कुणबी आणि मराठा यांच्यात फरक आहे. ते कायदेशीर दृष्ट्या वेगवेगळे आहेत, असे हाके म्हणाले.

मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो, असे कोणी सांगितले. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. माय बाप सरकार समजून घ्या. मी घरापासून दूर आलो, तरी जालना, बीड, परभणी भागात मी गेलेलो आहे. महाराष्ट्रातील शासनकर्ते खरे बोलायला तयार नाहीत, ते दूर पळत आहेत.

सरकारचे शिष्टमंडळ येईपर्यंत उपचार बंद…

लक्ष्मण हाके यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जर त्यांनी उपचार घेतले नाही तर परिस्थितीत आणखी गंभीर होऊ शकते, असा धोका डॉक्टरांनी वर्तवला आहे. उपोषणामुळे त्यांना थकवा आला असून त्यांचे ब्लडप्रेशर वाढलेले आहे. त्यांचे वजनही घटलेले आहे. शुगर, पल्स नॉर्मल आहेत. त्यांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. हायपरटेंशनमुळे हार्टअटॅक आणि पॅरालिसिससारखे धोके होऊ शकतात.

दुसऱ्या दिवशीही महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको

सरकार ओबीसी आंदोलनाकडे लक्ष देत नाही. ओबीसी आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर मंगळवारी टायर जाळून रास्ता रोको केले होते. परंतु, उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आज दुपारी ओबीसी समाज पुन्हा आक्रमक होत टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news