

Remove the encroachment, otherwise pension will be withheld!
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त आशिमा मितल यांनी शहरातील अतिक्रमण, रखडलेली विकासकामे आणि अनागोंदी कारभारावर कठोर भूमिका घेत संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.
किल्ला परिसर आणि मोतीबाग रेस्ट हाऊस येथील शासकीय इमारतींत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना तत्काळ जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले. सूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यास संबंधितांची पेन्शन थांबविणे व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मस्तगड येथील पालिकेच्या जुन्या इमारतीवर कर्मचाऱ्यांनीच केलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेऊन ती इमारत तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरातील प्रलंबित विकासकामांवरही आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम वर्षभरात केवळ २ टक्के पूर्ण झाल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच रेल्वे उड्डाणपुलाजवळ उभारलेले ई-व्ही चार्जिंग स्टेशन तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने ते तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
अंबड चौफुली परिसरातील अनधिकृत बाजार आणि रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने ती हटविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील अनधिकृत मटण व चिकन दुकाने हटवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
तसेच फुले मार्केट परिसरातील फेरीवाल्यांकडून होणाऱ्या वसुलीचा संपूर्ण हिशोब सादर करण्यास सांगितले. मोती बागेच्या पुनरुज्जीवनासाठी चौपाटी, सनसेट पॉईंट, ग्लो गार्डन व कारंज्यांचे नूतनीकरण, तसेच शहरातील उद्यानांचा विकास, डॉग कामात हलगर्जी नको शहराच्या मालमत्ता बळकावणाऱ्यांना आणि कामात हलगर्जी करणाऱ्यांना आता माफी नाही.
जालना शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. - आशिमा मित्तल, आयुक्त, जालना मनपा शेल्टर, ड्रेनेज दुरुस्ती आणि शाळा-आरोग्य केंद्र सुधारणा योजनेवर भर देण्यात आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन आणि सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पडताळणी यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.