Jalna Crime News : गावठी पिस्तूलसह दोन जणांना बेड्या

७.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
Jalna Crime News
Jalna Crime News : गावठी पिस्तूलसह दोन जणांना बेड्याfile photo
Published on
Updated on

Two people arrested with a village pistol

जालना, पुढारी वृत्तसेवाः अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने बदनापूर परिसरात सापळा रचून अटक केली. आरोर्पीकडून ७ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व स्कोडा कारचा समावेश आहे.

जालना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्री बदनापूर हद्दीत गस्त घालत असताना दोन इसम अवैध शस्त्रासह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमठाणा रोडवर पोलिसांनी सापळा रचला.

संशयित स्कोडा कार (क्र. एम.एच. ०३ बी.पी. ०१२९) अडवून तपासणी केली असता कारच्या डाव्या बाजूच्या सीटखाली लपवून ठेवलेले एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आले. या कारवाईत सचिन साहेबराव विंचाळ, भाऊलाल देवचंद जहऱ्हाडे (रा. नांदी, ता. अंबड) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे पिस्तूल व काडतुसे तसेच ७ लाख रुपये किमतीची स्कोडा कार असा ७ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाई गरजेची

जालना शहरासह जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तुलाचा सुळसुळाट झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावठी पिस्तुलातुन गोळ्या घालुन खुनाचे प्रकारही वाढले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अधिक सक्रिय होउन कारवाई करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news