Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करा

अन्यथा रस्त्यावर उतरू रविकांत तुपकर यांचा बॅंकांना इशारा
Farmer Loan Issues
भोकरदन : येथील महाराष्ट्र बँकेचे अधिकारी यांच्याशी चर्चा करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर.pudhari photo
Published on: 
Updated on: 

भोकरदन : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना बँकांकडून पीक कर्ज वाटपात होत असलेल्या दिरंगाईबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा भोकरदन येथे भेट देऊन व्यवस्थापक प्रशांत वाघ यांची भेट घेतली.

यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करण्याची ठाम मागणी केली. सध्या खरीप हंगाम वाया गेला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. बँकेने कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नये, तत्काळ कर्ज मंजूर करावे, अशा सूचना त्यांनी व्यवस्थापकांना दिल्या.

Farmer Loan Issues
Jalna Water Scarcity : घनसावंगी तालुक्यात पाण्याअभावी ऊस होरपळला

शेतकरी आधीच दुष्काळाने हवालदिल झाला आहे, त्यात बँकेने सहकार्य न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. व्यवस्थापकांनी येत्या काही दिवसात प्रलंबित असलेले सर्व पीक कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

तसेच तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब लवकरच दूर करणार असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Farmer Loan Issues
Mumbai Share Trading Fraud: आधी नफ्याचे पैसे दिले, नंतर कोट्यवधींचा गंडा! मुंबईतील व्यावसायिकाची ४.९२ कोटींची फसवणूक
  • रविकांत तुपकर यांनी यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक केदार यांच्याशी फोनवरून चर्चा करून सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना तत्काळ प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच बॅंकानी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शेतकर्‍यांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news