Mumbai Share Trading Fraud: आधी नफ्याचे पैसे दिले, नंतर कोट्यवधींचा गंडा! मुंबईतील व्यावसायिकाची ४.९२ कोटींची फसवणूक

सुरुवातीला तीन लाखांचा नफा देऊन केला विश्वास संपादन; कर्मचाऱ्यालाही १० लाखांचा फटक
 Fraud
FraudPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी कुलाब्यातील एका ट्रॅव्हल एजन्सी व्यावसायिकाला ४ कोटी ९२ लाख रुपयांना गंडा घातला. सुरुवातीला गुंतवणुकीवरील नफ्यापोटी २ लाख ९७ हजार रुपये काढण्याची परवानगी देऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.

या फसवणुकीच्या जाळ्यात व्यावसायिकाचा ४८ वर्षीय कर्मचारीही अडकला असून त्याला १० लाख रुपये गमवावे लागले आहेत.

 Fraud
Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी लोकलचे वेळापत्रक बदलणार! मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, प्रवासापूर्वी वाचा

दक्षिण सायबर पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक, बनावटगिरी आणि तोतयागिरीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेली बँक खाती, संबंधित गुंतवणूक ॲप आणि आरोपींची ओळख यांचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाब्यात ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या ५६ वर्षीय व्यावसायिकाला १० ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंगसंदर्भातील जाहिरात दिसली.

जाहिरातीशी जोडलेल्या अर्जात माहिती भरल्यानंतर ‘अनन्या शर्मा’ नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. तिने गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीशी संबंधित असल्याचे सांगून त्यांना व्हॉट्सॲप समूहात सहभागी केले.

या समूहात शेअर बाजारातील गुंतवणुकीचे सल्ले दिले जात होते. समूहातील सदस्य मोठा नफा मिळत असल्याचे संदेश दावे करत असल्याने व्यावसायिकाचा संबंधित मंचावरील विश्वास वाढला.

 Fraud
Mumbai Navratri 2026: मुंबईतील देवी मंदिरांत नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी! दर्शनासाठी विशेष व्यवस्था, १०० हून अधिक स्वयंसेवक तैनात

संबंधित मंचावर विश्वास बसल्याने व्यावसायिकाने आपल्या ४८ वर्षीय कर्मचाऱ्यालाही गुंतवणूक करण्यास सांगितले. कर्मचाऱ्यानेही सुमारे १० लाख रुपये गुंतवले. दरम्यान, २७ सप्टेंबरपर्यंत व्यावसायिकाने एकूण ४ कोटी ९२ लाख रुपये या मंचावर गुंतवले होते.

मात्र, पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांची विनंती वारंवार नाकारण्यात आली. याबाबत ‘अनन्या शर्मा’ हिच्याशी संपर्क साधला असता, आपण आयपीओमध्ये गुंतवणूक केली असून पैसे काढण्यासाठी आणखी रक्कम भरावी लागेल, असे तिने सांगितल्याचा आरोप आहे.

त्यामुळे संशय आल्याने व्यावसायिकाने सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रार दक्षिण सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.

ॲपवर दिसणाऱ्या नफ्यामुळे विश्वास

१७ ऑगस्ट रोजी महिलेने त्यांना शेअर ट्रेडिंगसाठी ॲप वापरण्याची पद्धत समजावून सांगितली. त्यानंतर व्यावसायिकाने गुंतवणूक सुरू केली. ॲपवर प्रत्येक व्यवहारासाठी बँक खात्याचा तपशील दिला जात होता. त्यानुसार त्यांनी आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे विविध खात्यांमध्ये पैसे पाठवले.

ॲपवरील पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील नफा दिसत असल्याने त्यांनी आणखी पैसे गुंतवले. त्यांनी नफ्यातील २ लाख ९७ हजार रुपये काढण्याची विनंती केली. ही रक्कम त्यांना मिळाली. सुरुवातीला पैसे काढण्याची परवानगी देऊन गुंतवणूक मंच खरा असल्याचा विश्वास निर्माण करण्याचा आरोपींचा हेतू असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news