Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

गूळखंड येथे वीज पडून दोन बैल ठार, झाडे पडली, पत्रे उडाले
Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊसFile Photo
Published on
Updated on

Rain with gusty winds in the Jalna district

जालना, पुढारी वृत्तसेवा

जालना शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सतत दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने दाणादाण उडवली. मंठा तालुक्यातील गूळखंड येथे वीज पडून दोन बैल ठार झाले. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले.

Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
Jalna Education News : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके : गट शिक्षणाधिकारी चव्हाण

जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाने जोर धरला आहे. जालना शहरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरातील बीज पुरवठा जवळपास दोन तास बंद होता. वादळी वारे व पावसामुळे अनेक भागांत झाडांच्या फांद्या तुटल्या.

आगामी पाच दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील विविध बियाणे व खतांच्या दुकानांवर शेतकऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती, पावणेसात वाजेच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतरही आकाशात ढगांचा गडगडाट सुरूच होता. अंबड येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
Jalna News : साहेब, चिखलाचा मार्ग खडतर; पाडळी ग्रामस्थांचा आक्रोश : पाटबंधारे समोर ठिय्या

वादळी वाऱ्यामुळे ग्रामसंसद कार्यालयासमोरील झाड पडले. बादळी वाऱ्याचा जोर एवढा जबरदस्त होता की, वादळाच्या भीतीने बसस्थानक परिसरात फळ विक्री करणाऱ्यांनी गाड्या सोडून पळ काढला. अनेक दुकानांवर फलक, प्लास्टिक शिट, घरावरील पत्रे वादळात उडून गेले. मंठा तालुक्यातील गूळखंड येथे वीज पडून अंकुश तुळशीराम कदम यांच्या शेतातील दोन बैल ठार झाले. तलाठी अमोल उफाड, शिवाजी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

अंबड शहरात पाऊस पडताच वीज गुल

अंबड शहरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. अंबड शहरात दुपारपासूनच नागरिक उकड्याने हैराण होते. सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास शहरात काळाकुट्ट अंधार होऊन वादळी वारे व मेघगर्जनेसह जोराचा पाऊस पडला. पावसामुळे वाहनचालकांना हेड लाईट लावून मार्गक्रमण करावे लागले. अंबड शहरात सायंकाळी साडेपाच वाजता खंडित झालेला वीजपुरवठा साडेसात वाजेपर्यत बंद होता. शहरात पडलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याचे दिसून आले. पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीस वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news