

Rain everywhere in Pimpalgaon Renukai
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई सह परिसरात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.
पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपली असली तरी आणखी मोठा पाऊस होऊन नदी, नाले, धरणे तुडुंब भरावी, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहे. पेरणीपासूनच पावसाने हुलकावणी दिली आहे. रिमझिम पावसावरच पिके जोमदार आली. मात्र जुलै संपत आला असला तरी पावसाने मोठा खंड दिला. सोयाबीनला फुले लागण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला.
पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन, मका, कपाशी पिकातून यावर्षी अपेक्षित उत्पादन हाती लागणार नाही. मात्र अशाही परिस्थितीत काही तरी हाती लागेल म्हणून पाऊस पडावा, म्हणून बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या.
बहुतांश शेतकऱ्यांनी पर्यायाने पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली. सलग दोन दिवस पाऊस तिसऱ्या दिवशी ही ढगाळ वातावरण मागील काही दिवसांपासून पाऊस नव्हता. त्यामुळे पिके सुकू लागली होती. शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट बघत होते. परंतु सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. आणि शेतकऱ्यांचा पिकांना पाणी देण्याचा त्रास देखील वाचला असल्याचे शेतकरी शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन नव्हते, असे मात्र पावसाकडे डोळे लावून बसले होते.
खरिप हंगाम पूर्णतः पाण्याअभावी हातातून जातो की, अशी भीती कोरडवाहू शेतकऱ्यांना लागली होती. परंतु शुक्रवारी व शनिवारी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस पिकासाठी पोषक असल्याने खरिपातील हजारो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या काही ठिकाणी सोयाबीन फुले लागण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता होती.