

Crowd for darshan of Lord Mahadev at Srikshetra Vigyaneshwar Apegava
शहागड, पुढारी वृत्तसेवा : अबंड तालुक्यातील पैठण-शहागड राज्य महामार्गावर शहागड पासून १४ कि.मी. अतंरावर विज्ञानेश्वर आपेगाव येथे देवाचे आदी देव जागृत शंकर भगवानाची गोदावरी नदीकाठी प्रसिद्ध पिंड आहे. श्रावणच्या पहिल्या सोमवारी हार-हार महादेवाच्या गजरात गोदावरी नदीपात्रात गोदा-वरीचे पाणी घेऊन भगवान शंकराला अभिषेक घालण्यासाठी खुप-लाबूंन महादेवाचे भक्त रात्री अडीच वाजल्यापासून पायी दर्शनासाठी आलेले होते.
सकाळी चार वाजता महादेवाची आरती होऊन, शृंगार दर्शन झाले. दुपारी बारा वाजता पुन्हा आरती होऊन महाप्रसादचा लाभ भक्तांनी घेतला. यावेळी मंदिराचे चार वाजता गाभाऱ्याच्या दरवाजे उघडल्यानंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत भक्तांची मांदियाळी या ठिकाणी होती. दर्शन रांगेमध्ये मंदिर व्यवस्थापन समितीकडून महिला पुरुष यांची स्वातंत्र रांगा करण्यात आलेल्या होत्या.
तर दर्शनासाठी महिलांची लक्षणीय गर्दी होती. मंदिर व्यवस्थापन समितीकडून पिण्याचे पाण्याची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था भक्तासाठी करण्यात आ लेली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हि सकाळी महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर व्यवस्थापन समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
तर गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जंगले, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर कटुंले यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
पांगरी गोसावी पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र नांगरतास व श्री क्षेत्र शंभु महादेवाच्या दर्शनासाठी पहिल्याच सोमवारी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सोमवारी पावसाने उघड दिल्याने व पहिला सोमवार असल्याने भाविकांमध्ये दर्शन घेण्यासाठी उत्साह दिसत होता. नांगरतास येथे पहिल्यापासूनच स्वच्छता व सुव्यवस्था होती. परंतु शंभु महादेव येथे रामगीरी बाबा ट्रस्टच्या हाती करभार आल्यामुळे श्री भागवतगीरी महाराज व बालकगीरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून भाविकांना व्यवस्थीत रांगेत दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.