

Raid on prostitution business in Jafrabad
जालना, पुढारी वृत्तसेवाः जाफ्राबाद येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने जिल्हा परिषद शाळेच्या बाजुला पत्र्याच्या शेडमधे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकुन २ महिला व १ पुरूष आरोपींना जेरबंद केले. कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली.
जालना येथील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की, जाफ्राबाद शहरातील जिल्हा परीषद शाळेच्या बाजुला पत्राच्या शेड मध्ये दोन महिला त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरुन महिलांना आणुन वेश्या व्यवसाय करीत आहेत.
या ठिकानी पथकाने छापा मारला असता त्यांना दोन महिलांसह ग्राहक राहुल हरी सुरासे (रा. पिंपळगाव कड ता. जाफ्राबाद) असे दोन पिडीत महिलासह मिळुन आले. पथकाने त्यांच्या ताब्यातुन रोख, मोबाईल व इतर २६ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, जाफराबादचे पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी दिपाली शिंदे, पोउपनि रविंद्र जोशी, पोउपनि संजय गवळी, कृष्णा देठे, म.पो. अंमलदार संगिता चव्हाण, आरती सावळे, रेणुका राठोड यांनी के ली.
जालना जिल्ह्यात पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून वेश्या व्यवसायावर छापे टाकले जात आहेत. अनेक महामार्गावरील हॉटेल व लॉजमधे गैर प्रकार सुरू असल्यामुळे पोलिस प्रशासनाने त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.