

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : श्री गणेशोत्सव तोंडावर असताना बाप्पाच्या मूर्तीच्या उपलब्धतेबाबत बाजारात संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या मूर्तीवर यंदा महागाईचे सावट दिसन येत आहे.
उठवण्यात उच्च न्यायालयाकडून प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मर्तीवरील बंदी उशिरा आल्याने मर्तिकारांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून बाजारात यंदा ४० ते ५० टक्क्यांपर्यत मूर्तीची टंचाई भासवू शकते. परिणामी मूर्तीच्या किमतीही लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी गणेश मंडळांकडून पीअेपीच्या मूर्तीना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा पारंपरिक मूर्तीची मागणी अधिक आहे. डोलारा बसलेले, वारीतले बाप्पा आणि रामभक्त रुपातील मूर्ती लोकप्रिय ठरत आहेत. पीओपीसह रंग, गोंद, मोल्ड्स, सजावटीच्या साहित्यांचे दर गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढले आहेत.
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा खर्च तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे मूर्तिकार सांगतात. पीओपीवरील बंदीच्या पार्वभूमीवर अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तीकडे वळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे यंदा शाडू मूर्तीचा ट्रेंड जोरात असून नैसर्गिक रंग व पारंपरिक सजावट असलेल्या मूर्तीला पसंती मिळत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीचे दर सरासरी २० ते ३० टक्क्यांनी वाढू शकतात. १ फूट मूर्तीची किंमत ५०० ते ८०० रुपये, तर ३ फुटांवरील मूर्ती ५००० ते ८००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
उत्सव जवळ येत असल्याने आता ग्राहकांकडून मूर्ती बुकिंगची मागणी वाढू लागली आहे, मात्र साठा कमी असल्याने अनेक मूर्तिकार इच्छित संख्येत मूर्ती देऊ शकणार नाहीत. परिणामी टंचाई जाणवणार असल्याचे मूर्तिकार सांगत आहे.