illegal sand mining : पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात अर्धनग्न आंदोलन

ड्रोन मोजमाप होईपर्यंत उत्खनन बंद करण्याची मागणी
illegal sand mining
जालना ः वाळू उपशाविरोधात अर्धनग्न आंदोलन करताना आंदोलक. pudhari photo
Published on
Updated on

मंठा ः मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेतीउपशाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मंठा यांच्या वतीने मंगळवार, दि. 28 रोजी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

या संदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करुन संबंधित प्रकार तत्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पूर्णा नदीपात्रातून टेंडरधारकांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा आणि वाहतूक सुरू आहे. यामध्ये जेसीबी, पोकलेनसारख्या यंत्रांचा वापर करून क्षमतेपेक्षा अधिक खोलीपर्यंत उत्खनन केले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नदीपात्राची नैसर्गिक रचना धोक्यात येत असून पर्यावरणीय हानीही वाढत आहे.

illegal sand mining
Illegal Sand Smuggling | नायगाव तालुक्यातील गोदावरी नदीतील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; यंत्रणा उद्ध्वस्त

आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रेती वाहतुकीतही मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत आहे. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रास, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रास किंवा त्याहून अधिक प्रमाणात रेती वाहतूक केली जात आहे. एकाच पावतीवर अनेक फेऱ्या टिप्पर आणि हायवा मारले जात असून, महसूल विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

तसेच, संपूर्ण रेती उत्खनन प्रक्रियेची ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग सिस्टीम) द्वारे मोजणी करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. जोपर्यंत ड्रोन कॅमेराद्वारे अचूक मोजमाप होत नाही, तोपर्यंत पूर्णा नदीपात्रातील सर्व प्रकारचे रेती उत्खनन तत्काळ बंद करण्यात यावे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

illegal sand mining
illegal sand mining Shivna river : शिवना पात्रातून अवैध वाळू उपसा

या संदर्भात एकूण अकरा मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले असून, त्या मागण्या मान्य न झाल्यास पूर्णा नदीपात्रातच उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलात विनायक पायकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव बागल, डिगांबर कोळी, जगन्नाथ दवणे आदींनी सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news