illegal sand mining Shivna river : शिवना पात्रातून अवैध वाळू उपसा

महसूल प्रशासन सुस्त : ग््राामस्थांनी पकडले हायवा, गुन्हा दाखल नाही
illegal sand mining Shivna river
शिवना नदीपात्रातील अवैध वाळू उपसा; ग््राामस्थांनी पकडलेले वाहन, तरीही कारवाईचा अभाव दिसून येत आहे. (छाया : रमाकांत बन्सोड)
Published on
Updated on

गंगापूर: शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीतील सनव परिसरात शिवना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ग््राामस्थांनी स्वतः पुढाकार घेत वाळूने भरलेली हायवा पकडूनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शिवना नदीपात्रात काही जणांकडून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे ग््राामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर संतप्त शेतकरी व ग््राामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अंदाजे तीन बास वाळूने भरलेली हायवा पकडून ठेवली.

illegal sand mining Shivna river
Satara kidnapping case: अनिल देसाई, संदीप मांडवेंवर अपहरणाचा गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शिवना नदीपात्रात काही जणांकडून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे ग््राामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर संतप्त शेतकरी व ग््राामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अंदाजे तीन बास वाळूने भरलेली हायवा पकडून ठेवली.

घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अपेक्षित कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनी संबंधित वाहन पोलिस पाटील यांच्या ताब्यात देऊन घटनास्थळ सोडल्याची तक्रार ग््राामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घटनेला तब्बल 24 तास उलटूनही संबंधित वाळू तस्करांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा दंडात्मक कारवाईही झालेली नसल्याने ग््राामस्थांमध्ये तीव नाराजी पसरली आहे.ग््राामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, येत्या काळात अशा प्रकारांना आळा न बसल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

illegal sand mining Shivna river
Dudhna river illegal sand mining : दुधना नदीत अवैध रेती उत्खनन; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणात महसूल व पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिवना नदीपात्राचे मोठे नुकसान

अवैध वाळू उपशामुळे शिवना नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पाण्याची पातळी घटणे, नदीकाठची धूप वाढणे तसेच शेतीवर विपरित परिणाम होणे, अशा समस्या निर्माण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तरीही अशा प्रकारांवर प्रभावी नियंत्रण न ठेवल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, अवैध वाळू उपसामुळे नदीपात्रात पाणी राहत नाही. कितीही पाऊस झाला तरी वाळू नसल्याने काही दिवसांतच नदीपात्र कोरडे होते. ग्रामस्थांत याबाबत कमालीची नाराजी आहे. कधीकाळी दुधडी भरून वाहणाऱ्या या नदीची अशी स्थिती पाहून वडिलधारी ग्रामस्थ हळहळ व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news