

Even after demolishing the Urdu school building, the approval is still pending.
सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडून तब्बल सहा महिने उलटूनही अद्यापी मान्यता मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांतून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, धोकादायक असल्याने शाळेची जुनी इमारत पाडण्यात आली होती. नव्या इमारतीसाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला असला, तरी मान्यतेची प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अंतरिम व्यवस्था म्हणून काही वर्ग तात्पुरत्या जागेत चालवले जात असले, तरी मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आन्वा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत पहिली ते सात पर्यंत वर्ग असून या शाळेत जवळपास दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दरम्यान सध्या एकूण चार शाळा वर्ग खोल्या असून एक खोली मुख्याध्यापक कार्यालय असून तीन वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना बसावे लागत असून एकाच वर्ग खोली दोन वर्गाचे विद्यार्थी बसत आहे. त्यामुळे इतर वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. वर्ग खोल्या कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असून याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आर- ोप नागरिकांतून होत आहेत.
वारंवार पाठपुरावा तरी आश्वासनांचे केवळ गाजर
पालकांनी वारंवार प्रशासनाचा पाठपुरावा करूनही फक्त आश्वासने मिळत असल्याचे सांगितले. इमारत पडल्यानंतर शाळा चालू ठेवण्यासाठी आम्ही अनेक सहकार्य केले, परंतु मान्यता न मिळाल्याने आमच्या मुलांचे नुकसान होत आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन शाळेला मान्यता मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.