

Three mobile forensic vans are available.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्हयात १९ पोलिस ठाणे असून पोलिस ठाणे हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, दुखापत, जबरी दुखापत, फूस लावून पळून नेणे, बलात्कार, आत्महत्यास प्रवृत करणे, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, पोस्को, हुंडा बळी, अंमली पदार्थ विरोधी कार्यावाही असे गुन्हे घडत असतात. पोलिस दलाकडून आरोपीविरुध्द घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात होते, परंतु पुरावे गोळा करतांना पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या.
जालना जिल्हा पोलस दलासाठी अत्याधुनिक तीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध करून दिल्यामुळे आता गुन्ह्यातील पुरावे गोळा करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने जालना जिल्हा पोलिस दलासाठी अत्याधुनिक तीन मोबाईल फॉरे-न्सिक व्हॅन्स उपलब्ध करून दिल्या आहेत.
जिल्ह्याती उप विभागीय अधिकारी कार्यालयासाठी त्या उपलब्ध राहणार आहे. सदर मोबाईन फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतीक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्याकरिता किट्स, रसायने व साघ सामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स या जिल्ह्यातील घडणाऱ्या सर्व घटनास्थळी विनाविलंब भेट देऊन आरोपी विरुध्द भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा केल्याने आरोपीस न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे.
३ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स
जिल्हा पोलिस दलातील उप विभाग जालना, भोकरदन व परतूरकरिता ०३ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स मिळालेल्या आहे. सर्व मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स या उप विभागा प्रमाणे कार्यरत असणार असून त्यावर उप विभागीय पोलिस अधिकारी हे देखरेख ठेवणार आहे.