Jalna News : आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

आन्वा : कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे नागरिकांचे हाल
Jalna News
Jalna News : आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर File Photo
Published on
Updated on

Primary Health Center in Anwa on Saline

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Jalna News
Jalna News : परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम; गुन्हा दाखल

या केंद्रांतर्गत येणाऱ्या आजूबाजूच्या गावातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडचणीत सापडले आहे. कर्मचारी नसल्यामुळे सर्व केद्रांचा भार उपस्थित कर्मचाऱ्यांवर पडला आहे. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य सेवा देण्यास देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या आरोग्य केंद्राबाबत शासन गंभीर असले तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यामुळे स्थानिकांना शासकीय आरोग्य केंद्राऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Jalna News
Parsi Hill : पारशी टेकडी बनतेय 'ऑक्सिजन पार्क'

शासकीय आरोग्य केंद्र असूनही खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यातील एकमेव असलेल्या या आरोग्य केंद्राकडे लक्ष देऊन आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या या रुग्णालयात आरोग्य कर्मचारी १, आरोग्य सेविका ३, कंपाऊंडर १, शिपाई २, क्लार्क १, १ आरोग्य साहिका (एल. एच. व्ही), आरोग्य सहाय्यक१ ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्याची मागणी केली जात आहे.

सध्या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नेमणूक असली तरी या ठिकाणी एकच डॉक्टर काम पाहत आहेत. तर दुसरे डॉक्टर रजेवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टरांची देखील कमतरता भासत असल्याची ओरड स्थानिकांनी केली आहे.

येथील आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असून कर्मचारी नसल्याने आमच्यावर ताण पडत असला तरी आम्ही रुग्णांना चांगली सेवा देत आहोत. रिक्त पदासंदर्भात आम्ही जिल्हा आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.
-सुंदर लटपटे, वैद्यकीय अधिकारी, आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news