Jalna News : भोकरदन तालुक्यातील शाळा खोल्यांची दुरवस्था

आम आदमी पार्टीच्या सर्व्हेतून तालुक्यातील चित्र उघड
Jalna News
Jalna News : भोकरदन तालुक्यातील शाळा खोल्यांची दुरवस्था File Photo
Published on
Updated on

Poor condition of school rooms in Bhokardan taluka

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील शाळांचा सर्व्हे आम आदमी पार्टीन एक आठवडाभरात केला असून अनेक शाळा खोल्या पडण्याच्या परिस्थितीत आहेत. भौतिक सुविधा शाळांना नसतानाच शिक्षक अशैक्षणिक कामामध्ये व्यस्त असल्याने त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.

Jalna News
Soybean Crop : सोयाबीन पिकावर उन्नी रोगांचा प्रादुर्भाव

आम आदमीने याबाबत प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे कि, सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर सरकार मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढत आहे. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकार टाळू पाहत आहे. वास्तविक सरकारनेच मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे जाहीर केलेले आहे.

राईट टू एज्युकेशन कायदा लागू केलेला आहे. असे असताना सरकार पळवाटा काढून संस्थेकडे शाळा देत आहे. काही शाळा बंद करत आहे. पटसंख्येचे कारण दाखवून काही शाळा दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याची योजना आखण्याचे काम सुरु आहे. दुसऱ्या बाजूला सरकारमधील कारभारी मनमानीपणे कोणताही खर्च गरज नसताना करत आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की राज्यकर्त्यांना शिक्षणाबद्दल अनास्था का आहे?

Jalna News
Jalna Crime News : लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

शिक्षणावर होणारा खर्च अनाठाई असे राज्यकर्त्याचे मत आहे का? दिल्लीमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीन शिक्षणाच्या सर्व स्तरावर क्रांती घडवून आणली. आजही पंजाबमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये पार्टीन पूर्ण क्रांती घडवून आणण्याचा विडा उचललेला आहे. जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये टिकणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी जबाबदारी पंजाब सरकारने घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी भाजप आणि इतर पक्षांचे सरकार आहे त्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत अनास्था आढळून येत आहे.

गेल्या १ ते ७ तारखेपर्यंत भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी केली असता अनेक इमारतींच्या वर्ग खोल्या मोडकळीस आल्याचे दिसून आले. त्या पाडून नवीन खोल्या बांधण्याचीसुद्धा सरकारला गरज वाटत नाही.

इमारती पडत आहेत शिक्षकांची संख्या कमी आहे. भौतिक सुविधा शाळांना पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे खापर मात्र शिक्षकावर फोडून शिक्षकांना बदनाम करण्याचे कारस्थान पुढारी असणारे संस्थाचालक करत आहेत. सरकार प्राथमिक शिक्षण देण्याचे कर्तव्य टाळू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news