

Methi vegetable preferred intercrop Pimpalgaon Renukai
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी मका पिकात अंतरपीक म्हणून मेथीच्या भाजीला पसंती दिली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मेथीची लागवड करण्यात आली आहे.
खरीप हंगामात मका पिकांत आंतरपीक म्हणून मेथी टाकण्यात आली आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजार मंगळवार असतो. या आठवडी बाजारात परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक व शेतकरी खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात.
या भागातील बीस ते पंचवीस गावात एक आठवडी बाजार असल्याने खरेदीसाठी नागरिक येतात. यामुळे या भागातील नागरिक मेथी, शेपू, टोमॅटो, भेंडी, कारले, दोडके, वांगे, गोंबी आदी पिकांकडे वळलाले दिसून येत आहे.