

Ghanshyam Goyal felicitated by Home Minister Amit Shah
जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील कालिंका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांचा मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी महोत्सव व नूतनीकृत मुख्यालय शुभारंभकार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे, अशिष शेलार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात लाखो कोटींच्या सहकारी बँक व क्रेडिट सोसायट्यांतील आव्हानांवर तसेच आगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली.
२०२५ वर्षास इंटरनॅशनल इयर ऑफ को-ऑपरेटिव्ह म्हणून साजरे करण्याचे ठरले. यावेळी आयोजित कार्यक्रमात जालना येथील कालिंका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.