

वाळूज महानगर : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या भामट यास पोलिसांनी अटक रून त्याच्याजवळून क ८ लाख ७४ हजार रुपये किमतीचे ६६ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले.
या विषयी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले की, एएस क्लब परिसरात दुचाकीवरील दोन भामट्यांनी २० फेब्रुवारी रोजी पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, तर २२ फेब्रुवारी रोजी याच परिसरात एका लग्न समारंभासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे गंठण हिसकावून नेले होते. त्यानंतर १० मार्च रोजी पुन्हा दोन भामट्यांनी सिडको वाळूज महानगरातून एका महिलेचे ११ ग्रॅम वजनाचे गंठण हिसकावले होते. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, सागर पाटील यांच्या पथकाकडून सुरू होता.
दरम्यान, करमाळा पोलिसांनी मंगळसूत्र चोरीच्या घटनेत फिरोज लखन अजिज शेख (३२, रा. मुकींदपूर, नेवासा फाटा) या सराईत गुन्हेगारास अटक केली होती. दरम्यान, गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून फिरोज यानेच वाळूज भागातून महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याचे तपासात समोर आले होते. काही दिवसांपूर्वी फिरोज हा जामिनावर सुटताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी फिरोजला करमाळा येथून २७ मार्च रोजी अटक केली होती.
पाच दिवसांची कोठडी
करमाळा येथून फिरोजला अटक करून पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी फिरोजला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसकोठडीदरम्यान फिरोज याने त्याचा साथीदार अमर कांबळे (रा. नेवासा) याच्या मदतीने एएस क्लब व सिडको वाळूज महानगर येथून तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली.
फिरोज विरुद्ध १६ गुन्हे
आरोपी फिरोज हा सराईत मंगळसूत्र चोर असून, त्याच्यावर नेवासा पोलिस ठाण्यात ४, अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात ५, जालना सदर बाजार ठाण्यात २, करमाळा पोलिस ठाण्यात १, बारामती पोलिस ठाण्यात १, सिन्नर पोलिस ठाण्यात १ तसेच एमआयडीसी वाळूज व सातारा पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असा १६ गुन्हे दाखल आहेत.