Jalna Crime : पूर्ववैमनस्यातून शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला

आनंदवाडीत पिता-पुत्रासह महिला गंभीर, गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

जालना : परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथे पूर्ववैमनस्यातून माने आणि भापकर कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवार, दि. २९ रोजी घडली. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून एकमेकांविरोधात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एका प्रकरणात वसंत भापकर यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (२९ ऑगस्ट) सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास वसंत भापकर हे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शेतात जात होते. त्यांना कृष्णा काशीनाथ माने व सुदाम रामेश्वर माने यांनी अडवले. भापकर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी मुंजा काशीनाथ माने याने कमरेला खोचलेला चाकू काढून थेट वसंत भापकर यांच्या डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Crime News
illegal sand mining : केळणा नदीपात्रात वाळू माफियांचा पर्दाफाश

वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा गणेश पुढे आला असता, आरोपी कृष्णा माने याने हातातील लोखंडी रॉडने गणेशच्या डोक्यात दोन ठिकाणी जोरात वार केले. मंदाकिनी भापकर मध्यस्थी करायला गेल्या असता मुंजा माने याने चाकूने त्यांच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच काशीनाथ माने यानेही रॉडने मारहाण केली.

जखमींना तातडीने परतूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथून पुढील उपचारासाठी जालन्यातील एका खासगी रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी वसंत भापकर यांच्या जबाबाहून आरोपी मुंजा काशीनाथ माने, कृष्णा काशीनाथ माने, काशीनाथ रामभाऊ माने आणि सुदाम रामेश्वर माने (सर्व रा. आनंदवाडी, ता. परतूर) यांच्याविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar crime : नवरदेव कुठेय? म्हणत मध्यरात्री हळदीच्या मंडपात घुसले; भाऊ आणि दाजीवर चाकूहल्ला

परस्पर तक्रार दाखल

मुंजा माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंजा माने आणि त्यांचा भाऊ कृष्णा माने घरासमोर असताना आरोपी सुनील देविदास भापकर व देविदास भापकर यांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच अरुण भापकर व योगेश मातने यांनी त्याला काठीने मारहाण केली. भावाला वाचवण्यासाठी मुंजा माने धावले असता आरोपी गणेश भापकर, राहुल भापकर व वसंत भापकर यांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि गजाने वार करून जखमी केले. तसेच मध्यस्थी करणाऱ्या आई चंपावती व वडील काशीनाथ माने यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमींवर जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news